पुणो : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका शिक्षकाच्या भूमिकेत येऊन देशभरातील विद्याथ्र्याशी संवाद साधत असताना, पुण्यात मात्र त्यांच्या वर्गाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. इंग्रजी माध्यमाच्या बहुतेक शाळा सकाळच्या सत्रत असल्याने; तसेच महापालिकेच्या काही शाळांमध्ये व्यवस्था न झाल्याने विद्याथ्र्याना मोदी गुरुजींचे भाषण ऐकता आले नाही. केंद्रीय विद्यालयांच्या काही शाळांमध्येही सक्ती न करता उत्सुक विद्याथ्र्यानाच भाषण ऐकविण्यात आले. मात्र, दुपारच्या सत्रतील काही शाळांमध्ये विद्याथ्र्यानी एकाचवेळी मोदीगुरुजींच्या वर्गात हजेरी लावली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रलयाने शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्रत्येक शाळेत ऐकविण्याबाबत राज्य सरकारला आदेश दिले होते. मात्र, हे भाषण विद्याथ्र्याना ऐकविणो बंधनकारक आहे की नाही, यावरून बराच गोंधळ उडाला. तरीही शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना भाषणाबाबत तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुण्यातील अनेक शाळांनी मोदी यांच्या भाषणाची जय्यत तयारी केली होती. विविध शैक्षणिक संस्थांच्या बहुतेक शाळांमध्ये मोदी यांच्या भाषणासाठी तयारी करण्यात आली होती. काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गात टीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. तर, काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गात स्वतंत्रपणो साऊंड सिस्टिमच्या माध्यमातून मोदींचे भाषण विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्यात आले. ज्या शाळांमध्ये सभागृहाची व्यवस्था आहे, तिथे प्रोजेक्टरवर सर्व विद्याथ्र्यानी एकाच वेळी भाषण पाहिले. नूमवी मुलांची आणि अहिल्यादेवी प्रशालेत पंतप्रधानांचे भाषण विद्याथ्र्यानी ऐकले. नूतन
मराठी विद्यालय मराठी शाळांमध्ये टीव्हीसमोर माईक लावून, ते स्पीकरद्वारे सर्व वर्गात ऐकविण्यात आले. रमणबाग, न्यू इंग्लिश स्कूल, रेणुकास्वरूप हायस्कूलसह काही शाळांमध्ये शिक्षकदिनानिमित्त पालक संघातर्फे शिक्षकांचा सत्कार समांरभ झाला. (प्रतिनिधी)
विद्याथ्र्याकडून उत्स्फूर्त दाद
थेट देशाचे पंतप्रधान आपल्याशी संवाद साधत आहेत, अशी भावना या वेळी विद्याथ्र्याच्या चेह:यावर होती. कधी धीरगंभीर तर हसरा चेहरा करून, तर कधी टाळ्यांचा कडकडाट करून, विद्यार्थी मोदीगुरुजींच्या ‘अध्यापना’ला प्रतिसाद देत होते. एरवी वर्गात पाऊण तास बसल्याने कासावीस होणारे विद्यार्थी मोदीगुरुजींना ऐकण्यासाठी पावणो दोन तास बसून होते. मोदींचे केलेले आवाहन असो व त्यांनी सांगिलेल्या आठवणींवर प्रत्येकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत उत्स्फूर्त दाद दिली.