उद्धव फंगाळ, ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा), दि. १३ - शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, सर्वांना लिहिता वाचता यावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणराज गणेश मंडळाच्यावतीने पालावर राहणाºया गोरगरिबांना साक्षरतेचे धडे दिले. शासनाच्यावतीने यावर्षी लोकमान्य गणेश उत्सव सुरु केला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवावे, साक्षरता अभियान राबवून त्याचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार करावा, याचाच एक भाग म्हणून गणराज गणेश मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे
यांनी बाहेर गावावरुन पोट भरण्यासाठी आलेल्या गोरगरिबांच्या पालावर जाऊन साक्षरता अभियान राबविले. पालावरील लहान-लहान मुले, पुरुष, महिला, वयोवृद्ध यांना प्रत्यक्षात फळ्यावर लिहून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. तर मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे, सचिव विनोद बडगुजर यांनी शालेय साहित्याचे सुद्धा वाटप केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे व त्यांच्या टिमने प्रत्यक्ष पालावर जाऊन पाहणी करुन उपस्थित पालावरील लोकांना शिक्षणासंदर्भात प्रश्न विचारले असता त्या पालावरील लोकांनी समाधानकारक उत्तरे दिली. गणराज गणेश मंडळाने सुरु केलेला साक्षरता अभियान उपक्रमाचे खºया अर्थाने समाजाला फायदा होत असल्याने गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाºयांचे कौतुक केले व असाच उपक्रम वेगवेगळ्या मार्गाने वर्षभर सुरु ठेवावा व त्यासाठी शिक्षण विभागाकडून योग्य ते सहकार्य केल्या जाईल, असे आश्वासन गट शिक्षण अधिकारी किशोर पागोरे यांनी यावेळी दिले. मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे हे एका पायाने अपंग असून ते राबवित असलेले उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. श्री गणेशाची स्थापना करीत असताना लोकवर्गणी जमा न करता स्वखर्चाने मंडळाचे विविध कार्यक्रम पार पाडतात. शासनाच्या सर्व
नियमांचे व पोलीस विभागाच्या सर्व नियमांचे पालन करुन गणराज गणेश मंडळ सतत १० दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे, सचिव विनोद बडगुजर, पवन भालेराव, दत्ता कोरवे, वैभव बाजड आदी
विविध कार्यक्रमासाठी सतत परिश्रम घेतात.