चिंचवड : महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाई प्रतिष्ठान व ए. एस. एम. ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार व कौशल्य विकास मेळाव्यात मंदीच्या काळातही दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसह अन्य पाच हजार तरुणांना संधी दिली. सव्वा दोन हजार गरजूंना ‘कमवा व शिका’ अंतर्गत संधी दिली. तरुणांना कौशल्य विकासाचे धडे देण्यात आले. चिंचवड येथील आॅटो क्लस्टरजवळील आय. बी. एम. आर. कॅम्पसमध्ये झालेल्या मेळाव्यास भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सीमा सावळे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जयश्री जगताप, नगरसेवक राजेंद्र जगताप, नवनाथ जगताप, शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे, आशा शेंडगे, प्रमोद ताम्हणकर, भाजपा नेते सारंग कामतेकर, रोजगार विभागाचे उपसंचालक डी. डी. पवार, एएसएम ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, संचालिका डॉ. आशा पाचपांडे, उदय कुलकर्णी, भाजपाचे नेते सारंग कामतेकर आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, ‘‘मंदीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित केला होता. तसेच तरुणांना मोफत मार्गदर्शनही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि स्कील इंडिया यासाठी मेळावा झाला. कौशल्य विकासावर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील दीडशे कंपन्या सहभागी झाल्या होत्या. १६ हजार बेरोजगारांची नोंदणी झाली. दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगारांना प्रामुख्याने प्राधान्य दिले.’’ (वार्ताहर)
तरुणांना कौशल्य विकासाचे धडे
By admin | Published: April 28, 2016 2:15 AM