"घरातील सगळे वाद संपू दे..."; पवार कुटुंब एकत्र करण्यासाठी अजितदादांच्या आईचे विठुरायाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:53 IST2025-01-01T11:51:52+5:302025-01-01T11:53:04+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले.

"Let all the disputes in the house end..."; Ajitdada's mother appeals to Vithuraya to unite the Pawar family | "घरातील सगळे वाद संपू दे..."; पवार कुटुंब एकत्र करण्यासाठी अजितदादांच्या आईचे विठुरायाला साकडे

"घरातील सगळे वाद संपू दे..."; पवार कुटुंब एकत्र करण्यासाठी अजितदादांच्या आईचे विठुरायाला साकडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 'घरातील सगळे वाद संपू दे, असं विठुरायाला साकड घातल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याने वाद पेटला; जळगावमधील पाळधीत मोठा राडा, संचारबंदी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात लढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. 

राष्ट्रवादी मधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आज उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठालाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी विठुरायाला साकडं घातले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना नवीन वर्ष सर्वांसाठी चांगले जावो असे म्हटले आहे. सर्व कौटुंबिक वाद संपले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: "Let all the disputes in the house end..."; Ajitdada's mother appeals to Vithuraya to unite the Pawar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.