शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

महाराष्ट्राचा जयजयकार ‘अखंड’ राहू दे!

By admin | Published: May 01, 2016 3:34 AM

आज महाराष्ट्र दिन. कधी नव्हे एवढी महाराष्ट्र तोडण्याची आणि अखंड ठेवण्याची भाषा सध्या बोलली जात आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर चढत आहे; विदर्भासाठी प्रसंगी रक्त सांडू

मुंबई : आज महाराष्ट्र दिन. कधी नव्हे एवढी महाराष्ट्र तोडण्याची आणि अखंड ठेवण्याची भाषा सध्या बोलली जात आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर चढत आहे; विदर्भासाठी प्रसंगी रक्त सांडू, असेही छातीठोकपणे सांगितले जाते. राजकीय पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत. पण सामान्यांना आणि खासकरून विविध क्षेत्रांतील मान्यवरांना अखंड महाराष्ट्राबद्दल किंवा विदर्भ, कोकण आणि मराठवाडा वेगळा करण्याच्या भूमिकेबाबत काय वाटते, ते ‘टीम लोकमत’ने जाणून घेतले.विकासावर लक्ष केंद्रित कराजेव्हा छोटी राज्ये स्थापन करण्याच्या मागणीमागे त्या राज्यांचा विकास करणे, रोजगारनिर्मिती करणे हा उद्देश असतो. मात्र आतापर्यंत स्थापन झालेल्या छोट्या राज्यांचा विचार केला तर तशी प्रगती झाल्याचे आपणाला कुठे दिसत नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ, मराठवाडा किंवा कोकणाची मागणी करताना याचाही विचार झाला पाहिजे. मुळात अशी स्वतंत्र मागणी करण्याची गरज नाही. कारण राज्य सरकारने विकासावर लक्ष केंद्रित केले तर कोणत्याही स्वतंत्र राज्याची मागणी होणार नाही. त्यामुळे असे उठाव करण्याऐवजी राज्याच्या विकासावर भर देणे हाच उत्तम मार्ग आहे.- दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेतेविकासाचे मॉडेल राबवास्वतंत्र मराठवाडा, स्वतंत्र कोकण आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरू लागली आहे. पण ही मागणी का होते आहे? याचा कोणी विचार करत नाही. उठावामागचे कारण कोणी शोधत नाही. विदर्भ किंवा तत्सम ठिकाणी मूलभूत सेवा-सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तिथला विकास झाला नाही. भूभागाचा विकास झाला म्हणजे विकास झाला, असे म्हणता येत नाही. तिथल्या लोकांच्या समस्या सुटल्या आहेत का? याचा विचार कोणी करत नाही. मुळात आपल्याकडे विकासाचे नियोजन नाही. म्हणून समस्या निर्माण होत आहेत. यावर उत्तर म्हणून विकासाचे मॉडेल राबवले पाहिजे.- वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्याविभाजनाची लाट केवळ ‘राजकीय’आतापर्यंत साहित्यातील अनेक महाराष्ट्र गीते विदर्भातील कवींनी लिहिली. त्यात विठ्ठल वाघ, राजा बढे, सुरेश भट अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र आता त्यांच्या महाराष्ट्राविषयी असलेल्या अस्मितेला तडा देण्याचा कट सुरू आहे विभाजनाने प्रश्न सुटणार नाहीत, हे राज्यकर्त्यांना कळत नाही. वेगळ्या विदर्भ-कोकणाच्या मागणीमागे केवळ राजकीय असूया आहे. विकास होत नाही, हा प्रशासनाचा दोष आहे. अशा मागणीने विभाजनाची लाट येईल, हे चुकीचे आहे. या सगळ्यात मराठी माणसांच्या भावनांचा कोणीच विचार करत नाही, हे दुदैव आहे.- अरुण म्हात्रे, कवीएकसंध राहण्यातच सर्वांचे हितमहाराष्ट्राचे तुकडे करून वेगळी राज्ये बनविण्यास आमचा विरोध आहे. छोटी राज्ये केल्यामुळे प्रशासकीय खर्च वाढेल. मुंबईमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तसेच दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रातील उत्पन्न इतर मागासलेल्या भागात वापरता येते. त्यामुळे महाराष्ट्र एकसंध राहण्यातच सर्वांचे हित आहे. शिवाय अनेक महामंडळे व संस्था यांचे राज्यातल्या विविध भागांत जाळे विणले आहे. ती बंद पडल्यास रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. मराठी भाषिकांची अनेक राज्ये होणे हे भाषावार राज्ये असली पाहिजेत या संकल्पनेलासुद्धा तडा देणारे आहे. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसराज्याचे तुकडे करण्याचा विचार आततायीपणाचा१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून विदर्भ मराठवाड्यावर अन्याय झाला, अशी जर तेथील नागरिकांची भावना असेल तर ती समजूत काढून दूर करता येईल.मात्र आता मराठवाडा आणि विदर्भाचा पंचवार्षिक योजना आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून अनुशेष भरून काढता येऊ शकतो. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. हा आततायीपणा ठरेल. - अ‍ॅड. गणेश सोवनीमहाराष्ट्राचे तुकडे होता कामा नयेतसंयुक्त महाराष्ट्रासाठी आपण खूप मोठा लढा दिला आहे. आणि आता जर स्वतंत्र विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाची मागणी होत असेल तर ते योग्य नाही. प्रत्येकाने जर अशी मागणी केली तर तो हुतात्म्यांचा अपमान ठरेल. याऐवजी आपण एकत्र राहत राज्याच्या विकासावर भर दिला तर ते अधिकच उत्तम राहील. - सुगंधी फ्रान्सिस, सामाजिक कार्यकर्त्यामराठी माणसाचा विचार करावा!राज्यातून विदर्भ, मराठवाडा, कोकण वेगळा करावा, अशी मागणी जोर धरते आहे. या मागणीचा सारासार विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी माणसासाठी काय चांगले आहे? याला प्राधान्य दिले पाहिजे. या निर्णयानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार केला पाहिजे. तिथे रोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तोडगा काढला पाहिजे.- डॉ. जलील परकार, ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ आर्थिक परिस्थितीचा विचार महत्त्वाचा!राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. एकत्रितरीत्या हे प्रश्न सोडवणे शक्य आहे. पण, राज्य दोन-तीन भागांत विभागले गेल्यास या प्रश्नांवर मात करणे कठीण होईल. सध्या राज्यभरात पाण्याची कमतरता आहे. मराठवाडा आणि विदर्भात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. कोकणातही शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत. एकूणच राज्यात असलेल्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. - डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन वेगळे होण्यापेक्षा विकासावर भर द्याविदर्भ आणि कोकणच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा राजकारणी नेतृत्वामुळे अधिक चांगला झाला आहे. मात्र त्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा आणि कोकण याची स्थिती वेगळी आहे. विदर्भात दळणवळणाची समस्या आहे. त्याचबरोबर वर्धा, भंडारा येथील नक्षलवादी कारवायांमुळे येथील विकास खुंटला आहे. वेगळे होण्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे.- फिरोज फारुक शेख, सचिव, वंदे मातरम् शिक्षण संस्थामहाराष्ट्र अखंड राहिला पाहिजेएक राज्य, एक भाषा अशा सूत्राने जर राज्याची विभागणी झालेली आहे, तर वेगळा विदर्भ आणि मराठवाडा असण्याची गरजच नाही. स्वतंत्र झाल्याने या समस्या दूर होतील का? स्वतंत्र होण्यापेक्षा समस्या दूर करण्यासाठी ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे. येथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी सगळ्यांनीच एकत्र येणे गरजेचे आहे; आणि त्यासाठी महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे. - प्रा. दीपा ठाणेकर, झुनझुनवाला महाविद्यालयमहाराष्ट्र एकसंध करण्याकडे लक्ष द्यावे‘तहान लागल्यावर विहीर खणायची’ हे जेवढे मूर्खपणाचे लक्षण आहे. यात प्रकर्षाने वेगळ्या विदर्भाचा हा मुद्दा उगाचच डोके वर काढत आहे. ज्या बौद्धिक आणि शारीरिक शक्तींचा वापर केला जात आहे त्याच विचारांच्या जोरावर महाराष्ट्र एकसंध कसा राहील व जगाच्या नकाशावर छाप कशी उमटवेल याकडे लक्ष केंद्रित करण्याची आज आवश्यकता आहे. ‘महाराष्ट्र दिना’पुरता महाराष्ट्र एक राहण्यासाठीच्या गप्पा न मारता महाराष्ट्र कायम एकच राहिला पाहिजे. - प्रा. प्रवीण वीर, प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतन राज्याची ताकद एकीमध्येसंयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांनी प्राण पणास लावले़ त्या महाराष्ट्राच्या विभाजनाची खरेतर गरज नाही़ या राज्याची ताकद त्याच्या एकीमध्ये आहे़ विभाजनातून वाद मिटणार आहेत का? उलट नव्याने सीमाप्रश्न निर्माण होतील़ त्यामुळे महाराष्ट्र संयुक्त राहणेच योग्य आहे़- रमेश प्रभू, अध्यक्ष, अ‍ॅफोर्डेबल हाउसिंग वेल्फेअर आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाविकासासाठी एकसंध महाराष्ट्राची गरजकोणत्याही गोष्टीचा विकास करण्यासाठी ती गोष्ट एकसंध असणे गरजेचे असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी एक महाराष्ट्र असणे गरजेचे आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात समस्या आहेत, हे जरी खरे असले तरी त्यांना महाराष्ट्रातून वेगळे करून या समस्यांचे निराकारण होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे होता कामा नयेत. समस्यांवर नेते मंडळींनी राजकारण बाजूला ठेवून उपाययोजना केल्यास वेगळा विदर्भ, मराठवाडा आणि कोकण हा मुद्दाच गौण ठरेल. - निशा ठक्कर, महिला अंध योग प्रशिक्षकमहाराष्ट्राचे तुकडे करून काहीच मिळणार नाहीस्वतंत्र विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याची मागणी करणे योग्य नाही. महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे. आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला पाहिजे. सध्या अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि ते गंभीर आहेत. ते प्रश्न तातडीने सोडविले पाहिजेत. सध्या दुष्काळासह भ्रष्टाचारासारख्या समस्यांनी महाराष्ट्र होरपळत आहे. यातून आपण मार्ग काढला पाहिजे. असे केले तरच आपला विकास होईल. महाराष्ट्राचे तुकडे करून काहीच मिळणार नाही.- शिवाजीराव चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनासर्वसामान्यांच्या हिताकडे लक्ष द्यावेगळे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची गरज आहे. ज्यात सर्व राजकीय पक्षांना स्थान असले पाहिजे. या प्रकरणांमध्ये पक्षीय राजकारण करून चालणार नाही. एकंदर राज्याचा विकास किती झाला हे पाहणेही महत्त्वाचे आहे. विकास झाला नाही म्हणून अशी मागणी होते आहे का ? याचा शोध घेतला पाहिजे. एखादे राज्य स्वतंत्र करायचे म्हटले तरी नंतर त्या राज्याचा सर्वांगीण विकास होईल की नाही? याचाही सारासार विचार केला पाहिजे.- डॉ. बी. आर. कुमार अग्रवाल, संचालक, सेफगार्ड ग्रुप आॅफ कंपनीज