शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

होऊन जाऊ दे, हलकल्लोळ !

By admin | Published: August 01, 2015 12:30 AM

-कारण राजकारण

एका नेत्याच्या (म्हणजे इस्लामपूरकरांच्या) अतिमहत्त्वाकांक्षेनं जिल्ह्याच्या राजकारणाची वाट लागल्याचा घणाघात सोनसळकर साहेबांनी या आठवड्यात केला. अर्थात याला घणाघात म्हणायचं की, घंटीची किणकिण, हे जिल्ह्यानं ठरवावं! कारण अलीकडं सोनसळकर आणि इस्लामपूरकर या दोन्ही साहेबांमध्ये खरंच फाटलंय का, असा खवचट सवाल ऐकायला येतोय. एवढे दिवस हातात-हात (कुणाला दिसणार नाही, अशा बेतानं) घालून फिरणाऱ्या या दोघांना पुरेपूर ओळखणाऱ्यांच्या डोक्यात असा संशयाचा किडा वळवळणारच. या गंडवा-गंडवीचा पुरेपूर प्रत्यय प्रतीकदादांनी घेतलाय. आता जिल्हा बँकेपाठोपाठ बाजार समितीत मदनभाऊ आणि विशालदादा घेताहेत, अशी कुजबूज सुरू झालीय. कोणे एके काळी या दोघा साहेबांना मुख्यमंत्रीपदाची आस होती. ती लपून राहिलेली नव्हती. त्यात सोनसळकरांची जरा जास्त चर्चा झाली. आता सरकार गेल्यानं दोघांनी ‘आधी जिल्ह्याचं बघू’, म्हणून इथं लक्ष घातलंय. (तसं दोघांनाही आता काही काम राहिलेलं नाही म्हणा!) जिल्ह्यावर ‘कमांड’ ठेवण्यासाठी आणि वसंतदादा घराणं नेस्तनाबूत करण्यासाठी पंधरा वर्षं धडपडणाऱ्या इस्लामपूरकरांना आता कुठं यश येतंय, असं वाटत असतानाच सोनसळकर आडवे आलेत. सांगलीच्या बाजार समितीत तर शेट्टींचे राजूभाई, प्रतीकदादा, विशालदादा, महाडिक कंपनी, ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ गुऱ्हाळकर (त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून संपत नसल्यानं त्यांचं आडनाव ‘गुऱ्हाळकर’ ठेवलंय म्हणे!), मिरजेचे हाफिजभाई या नेहमीच्या यशवंत-गुणवंत कलाकारांसोबत आता अजितराव घोरपडे सरकार, सांगलीवाडीचे दिनकरतात्या, कवठेपिरानच्या हिंदकेसरींचे भीमराव आणि ‘जनसुराज्य’चे नारळवाले बसवराजही सोनसळकर साहेबांसोबत एकत्र आलेत. सरकार, तात्या आणि बसवराज कालपरवापर्यंत संजयकाका आणि जगताप साहेबांसोबत होते, पण पदरात काहीच पडेना झाल्यावर त्यांनी काडीमोड घेतला. नारळवाल्या बसवराजांना तर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद दिलं होतं. मुदत संपल्यावर त्यांनी दुगाण्या झाडल्या!तिकडं इस्लामपूरकर साहेबांनी खासदार संजयकाका आणि जतच्या जगताप साहेबांना हिकमतीनं जवळ ठेवलंय. (दोघं अजून इस्लामपूरकरांच्या ऋणातून मुक्त व्हायचेत ना!) शिवाय आबांचे मावळेही त्यांच्यामागं फरफटत जाताहेत. काही मावळ्यांनी इस्लामपूरकर साहेबांपुढं पांढरं निशाण फडकवलंय, तर काहींनी जाहीरपणे संजयकाकांचं ‘कमळ’ हातात घेतलंय. (काय करणार? राजकीय साठमारीत टिकायचं तर असं ‘शहाणपण’ दाखवायलाच हवं.) सांगली बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी इस्लामपूरकरांची जय्यत तयारी सुरू असली तरी तासगाव बाजार समितीत मात्र त्यांना काकांना अंगावर घ्यायची वेळ आली, पण इस्लामपूरकर कसले हुशार! त्यांनी पुन्हा चतुराईनं आबा-काका गटात झुंज लावून दिलीय. बसा लढत आणि डोकी फोडत! मणेराजुरी जिल्हा परिषद गटातला वचपा काकांनी जिल्हा बँकेत काढला, तो कुणाच्या इशाऱ्यावर? आबांचे मावळे एकमेकांची गचांडी धरू लागले, ते कुणाच्या उद्योगामुळं? हे ज्यांना कळलं, ते एकतर आबांचा गट सोडताहेत किंवा राजकारणाला रामराम तरी ठोकताहेत!काही का असेना, जिल्हाभरात दोन्ही साहेबांची जुंपलीय म्हणायचं. (किमान समजायचं तरी!) मागील वेळी जिल्हा बँकेत एकत्र असल्यानं सोनसळकर साहेबांनी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी शपथ घेतली होती. त्यामुळं बँकेतल्या अड्डेबाजीवर ते गप्प होते. बँक बरखास्त झाली, प्रशासक आला (तो सोनसळकरांनीच आणला, असं आता इस्लामपूरकर म्हणताहेत.) निवडणूक लागली, तेव्हा इस्लामपूरकरांच्या कंपूनं जिल्हा बँकेला राजकारणाचा अड्डा बनवल्याची तोफ डागून सोनसळकरांनी रान पेटवलं होतं. ते लक्षात ठेवून इस्लामपूरकरांनी आता बाजार समितीला राजकारणाचा अड्डा होऊ देणार नसल्याचं आधीच सांगून टाकलं! वा रे पठ्ठे! त्यावर मदनभाऊंकडून हिसकावून घेतलेल्या बाजार समितीत रात्री कुणाचा अड्डा भरायचा? तिथं काय-काय चालायचं? याची उत्तरं सोनसळकरांनी इस्लामपूरकरांकडं मागितलीत. एवढं सगळं सुरू असताना बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालासाठी आणि व्यापार टिकवून ठेवण्यासाठी काय करणार, हे कुणीच बोलत नाही. तिथल्या प्रश्नांवर मात्र सगळ्यांचीच अळीमिळी-गुपचिळी!जाता-जाता : ‘त्यांचे इंटरेस्ट वेगळे आणि आमचे वेगळे. माझंच मीठ कसं खोटं निघतं? मी ज्याला हाताला धरून मोठं करतो, तो माझ्यावरच कसा उलटतो?’ असा सवाल घोरपडे सरकारांनी (स्वत:लाच) केला आणि संजयकाकांच्या वर्मी घाव लागला. मग ‘आम्ही तोंड उघडलं तर तुमची अडचण होईल...’ अशा जहाल शब्दात संजयकाकांनी सरकारांना बजावलं. आता काकांनी तोंड उघडावंच! कारण काका-सरकारांचं शीतयुद्ध (लुटुपुटुचं की खरंखुरं?) चव्हाट्यावर आलंय. लोकसभेला निवडून आणल्यानंतरही सगळी मलई (पक्षी : लाभाची पदं) काकांनाच... आणि आम्ही काय नुसत्या टाळ्या वाजवायच्या काय, या प्रश्नातून तर सरकार, दिनकरतात्या आणि काकांचं फाटलं नसेल ना? सरकारांनी तेही सांगून टाकावं आणि काकांनीही तोंड उघडून सरकारांची अंडीपिल्ली बाहेर काढावीत... होऊन जाऊ दे, कमळाबाईच्या तंबूमध्ये हलकल्लोळ! --- श्रीनिवास नागे