विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपाच्या सहकार्यामुळे मिळालेले खासदारपद राजू शेट्टी यांनी आधी सोडावे, मग मीदेखील राज्यमंत्रीपद सोडेन, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले. आपल्या नव्या संघटनेच्या नावाची घोषणा २१ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात केली जाईल, असे त्यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.खोत म्हणाले, नवीन संघटनेच्या स्थापनेसाठी नवीन मसुदा समिती नेमण्यात आली आहे. ही १६ जणांची समिती संघटनेचे नाव ठरवेल. संघटनेचा झेंडा अन् अजेंडा शेतकºयांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आपण बाहेर पडलो नाही, तर आपल्याला काढण्यात आले. स्वाभिमानी संघटनेत असताना आपल्याला तीन पातळीवर लढा द्यावा लागत होता. मंत्री झाल्यानंतर शेतकºयांच्या आपल्याविषयी वाढलेल्या अपेक्षा, विरोधकांचा हल्ला आणि स्वकीयांच्या अंतर्गत कुरघोड्यांचा सामना करावा लागला. आपल्याच संघटनेने आपल्याविरुद्ध चौकशी समिती नेमली. आपला शेतकरी संघर्षाचा ३३ वर्षांचा अनुभव असताना त्यात कमी अनुभवाच्या सदस्यांची नेमणूक करून आपल्याला अपमानित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या काळात आपल्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, रावसाहेब दानवे हे उभे राहिले. जे प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकले असते त्यासाठी मोर्चे काढून आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सदाभाऊ म्हणाले.राजू शेट्टींची आत्मक्लेश नव्हे, सदाभाऊक्लेश यात्राराजू शेट्टी यांना आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशी भीती निर्माण झाल्याने त्यांनी आपल्यावर आरोप केले. सरकार कर्जमाफीला तयार असतानाही त्यांनी काढलेला मोर्चा ही आत्मक्लेश यात्रा नसून सदाभाऊक्लेश यात्रा होती, असा टोला सदाभाऊंनी लगावला.
मी मंत्रीपद सोडतो, शेट्टी खासदारकी सोडतील का? सदाभाऊ खोत यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 4:15 AM