मुंबई : सातारा जिल्ह्यातील आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ९५ विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या परीक्षेला बसू देण्याची विनंती राज्य सरकारकडून मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाला (एमसीआय) केली जाणार आहे. विधान भवनात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या महाविद्यालयने २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत आयएमसीने हरकत घेतली होती. एमएस सीईटीच्या ऐवजी असोसिएट सीईटी परीक्षा घेतल्याने हे प्रवेश रद्द ठरविण्यात आले. यासंदर्भात विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारकडून आयएमसीला विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
‘त्या’ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्या
By admin | Published: March 11, 2017 12:58 AM