ठळक मुद्देविश्वात दुर्मीळ झालेल्या ‘सेरोपेजिया अंजनेरिका’ नावाची दुर्मीळ औषधी वनस्पती नाशिकमधील केवळ अंजनेरी गडावर अंजनेरी गावात गडाच्या प्रारंभी बाल हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे. ४ हजार २०० फूट उंचीचा अंजनेरी गड अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ
नाशिक : धार्मिक-पौराणिक शहर म्हणून नाशिक देशभरात नव्हे तर जगभरात प्रसिध्द आहे. कुंभनगरी म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा नावलौकिक आहे. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिरापासून तर प्रभू रामचंद्र यांच्या वनवासकाळातील तपोभुमी पर्यंत नाशिकला पौराणिक इतिहास लाभला आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत वसलेला गिरीदूर्ग प्रकारातील ४ हजार २०० फूट उंचीचा अंजनेरी गड अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून परिचित आहे.अंजनेरी गडापर्यंत जाण्यासाठी नाशिकमधून अर्धा तास पुरेसा होतो. अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी गावात पोहचल्यावर गडाची वाट धरता येते. गडाच्या निम्म्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनाने सहज जाणे शक्य आहे. दीड किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पूर्ण करता येते. नाशिक वनविभागाच्या अखत्यारितीत असलेला अंजनेरी गड हा संपूर्णपणे राखीव वन संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. अंजनेरी गडावर रात्रीचा मुक्काम अथवा कुठल्याहीप्रकारे ज्वालाग्राही पदार्थ किंवा प्लॅस्टिक अथवा नशेच्या वस्तू घेऊन जाणे प्रतिबंधित केले आहे. वन संवर्धन कायदा व वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत अंजनेरी गडाचा प्रदेश संरक्षित म्हणून नाशिक पश्चिम वनविभागाने घोषित केला आहे.
अंजनेरी गडापासून त्र्यंबकेश्वर अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्याने पंचवीस किलोमीटर अंतर कापल्यानंतर डावीक डे अंजनेरी फाटा लागतो. या फाट्याने वळण घेत पायथ्याच्या गावाने अंजनेरी गडावर जाता येते. अंजनेरी गड चढाईच्या दृष्टीने सोपा आहे. अंजनेरी गडावर पोहचल्यानंतर परिसरातील विहंगम नैसर्गिक दृश्य डोळ्यांची पारणे फेडतो. अंजनेरी गावात गडाच्या प्रारंभी बाल हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे. गडावर आजही हनुमानाची वानरसेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल मुखाच्या माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो. शनिवारी साजरी होणा-या खास हनुमान जयंतीच्या निमित्ताने अंजनेरी गडाला भेट दिली असता अंजनेरी गडाचे वैभव आणि गडावरील धार्मिक इतिहासाच्या स्मृती जाग्या झाल्या.
अंजनेरी गडावर जाण्यासाठी असलेली वाट पुर्वी बिकट होती; मात्र वनविभागाने गडाचे महत्त्व नैसर्गिकदृष्ट्या तर ओळखलेच मात्र धार्मिकदृष्ट्याही जाणले. गडावर जाण्यासाठी गावापासून मुरूम टाकून संरक्षक भिंत बांधून वाट तयार करण्यात आली आहे. या वाटेने दीड किलोमीटरचा डोंगर सहजरित्या वाहनाने चढता येतो. त्यानंतर मुख्य गडावर चढाईचा मार्ग गिरीप्रेमी व हनुमान भक्तांचे स्वागत करतो.गडावरील हा मार्गही चढाईच्या दृष्टीने आता सुकर झाला आहे. कारण वनविभागाने या मार्गावर पाय-या बांधल्या आहेत वरती दगडी कातळामधून असलेल्या वाटेभोवती संरक्षणासाठी लोखंडी शिडीदेखील लावण्यात आली आहे. पायºयांच्या सुरुवातीला वनविभागाने अंजनेरी गडाचे नैसर्गिकदृष्ट्या असलेले महत्त्व तेथे आढळणाºया वनौषधी, वन्यजीव संपदा, वृक्ष संपदेची माहितीफलक लावले आहेत. तसेच अंजनेरी गडावर जाताना पाळावयाचे नियम व घ्यावयाची दक्षता याविषयी माहिती देणारे सुचना फलक आहेत. काही पायºया चढून गेल्यानंतर वाटेत काही लेणी नजरेस पडतात. या लेणी जैन लेणी म्हणून ओळखल्या जातात. लेणीपासून पुढे काही अंतर चालून गेल्यास गडाच्या कातळाच्या मागील बाजूच्या पठार जणू दुर्गप्रेमी व हनुमान भक्तांचे विश्रांतीस्थळ म्हणून स्वागत करते. पठारावर काही वेळ विश्रांती घेतल्यास तेथून पुढे पंधरा मिनिटाची चढण पार करुन अंजनी मातेच्या मंदिरापर्यंत पोहचता येते. गडाच्या माथ्यावर पोहचल्यानंतर गडाचा विस्तार तर लक्षात येतोच मात्र सभोवतालच्या परिसरातील गंगापूर, वैतरणा, मुकणे, काश्यपी-गौतमी धरणांचा अथांग जलसागराचे सौंदर्यशाली चित्र डोळे दिपवून जाते.
विश्वातील दुर्मीळ वनस्पतीचा ‘गड’विश्वात दुर्मीळ झालेल्या ‘सेरोपेजिया अंजनेरिका’ नावाची दुर्मीळ औषधी वनस्पती नाशिकमधील केवळ अंजनेरी गडावर आढळते. या वनस्पतीचा शोध २०१३ साली जुई पेठे नावाच्या इकोलॉजिकल रिसर्चर यांनी लावला. गवताच्या आकाराची व अत्यंत कमी उंची असलेली ही वनस्पती अंजनेरी गडावर आढळून येते. वनविभागाकडून या दुर्लभ झालेल्या वनस्पतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०१४ साली या गडाच्या राखीव संवर्धनाचा प्रस्ताव वनविभागाकडे पाठविण्यात आला होता. यानंतर वनविभागाने हा प्रस्ताव मंजूर केला.