राइट टू पी : पालिकेच्या स्थायी सभेत मागणीमुंबई : महिलांना आवश्यकता भासेल तेव्हा खासगी स्वच्छतागृहांच्या वापराची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीतील चर्चेवेळी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी बुधवारी केली. हॉटेल, रुग्णालय, शाळा, खासगी कार्यालयांमधील शौचलायांचा वापर मर्यादीत न ठेवता सर्वच महिलांना करु देण्यात यावा, असेही त्यांनी मागणीत म्हटले आहे.महिलांकरिता शौचालय बांधण्यास वर्षभरात कोणत्याच हालचाली पालिका प्रशासनाने न केल्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूद वाया गेल्याची धक्कादायक बाब बुधवारी उघडकीस आली़ त्यामुळे हा विषय पुढे आला. खासगी शौचलायांत प्रवेश नाकारल्यास महिलांनी पालिकेकडे तक्रार करावी. कारवाई करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, असेही तृष्णा विश्वासराव यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
महिलांना खासगी स्वच्छतागृहे वापरू द्या
By admin | Published: March 10, 2016 4:03 AM