मुंबई : आज शिवराज्याभिषेक दिवस आहे. आजच्याच दिवशी १६७४ला किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कारभाराचा जगापुढे आदर्श आहे. त्याअर्थाने शिवराज्याभिषेक दिन हा संकल्प दिन मानून शिवछत्रपतींनी दिलेला वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, क्षणोक्षणी केवळ रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन आहे. त्यांचा लोककल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो. आव्हानांवर मात करताना धीरोदात्तपणे पुढे जाण्याचा त्यांचा बाणा आज मार्गदर्शक ठरतो आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाण्यासाठी, दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या. हे वचन त्यांच्या चरणी अर्पण करू या. यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा!, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हेही वाचा
कोरोनाच्या संक्रमणात रक्तगटाचीही महत्त्वाची भूमिका; 'या' लोकांना जास्त धोका
'त्या चीनविरोधी जाहिरातीमुळे ट्विटरकडून अमूलचं हँडल ब्लॉक?
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या
सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...
चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन
गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल
Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी
पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार
...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख