मुंबई : गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटचे जाळे वाढले आहे. एका क्लिकवर हल्ली जगाच्या पाठीवरील सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. इंटरनेटच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार व्हावा यासाठी मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायं. ६.३० वाजेपर्यंत ‘चला, मराठी आॅनलाइन करू’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. इबुक्स, मॅगझिन, इंटरनेट ब्लॉग्सच्या माध्यमातून विविध भाषांतील साहित्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. या साहित्यासोबतच आॅनलाइन मराठी भाषा टिकविण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन केंद्र आणि मराठी अभ्यास केंद्राने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या वेळी आयोजित कार्यशाळेतून ‘युनिकोड’, ‘ब्लॉगलेखन’, ‘विकिपीडिया लेखन’, ‘संपादन’, ‘संकेतस्थळ निर्मिती’ याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय आॅनलाइन मराठी भाषेच्या प्रसारासाठी काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून ँ३३स्र://६६६.्रङ्मि’६ङ्म१‘२ँङ्मस्र२.े४.ंू.्रल्ल/ें१ं३ँ्र६ङ्म१‘२ँङ्मस्र/ेङ्मल्ल’्रल्ली.ँ३े’ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
चला, मराठी करू आॅनलाइन
By admin | Published: October 03, 2016 2:10 AM