मुंबई : सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प महाराष्टÑात व तोसुद्धा नाणारलाच होईल. त्यासाठी विरोध करणाऱ्यांची संवादाद्वारे सर्व प्रकारची समजूत काढू, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान येथे स्पष्ट केले. पाईप गॅस योजनेसंबंधी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते मुंबईत आले होते.प्रधान म्हणाले, भारताची इंधनाची वार्षिक गरज २० कोटी टन असून ती दरवर्षी ४.२ टक्के वाढत आहे. नाणारचा प्रकल्प देशाची पुढील ५० वर्षांची गरज ओळखून उभा केला जात आहे. इंधन क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊन आयात कमी करायची असल्यास हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. विरोध होत असल्यास संवादातून समजूत काढली जाईल. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी वेळ दिली नसली तरी त्यात मान-सन्मानाचा प्रश्न नाही. पुन्हा वेळ मागू.नाणारला विरोध करणाºयांची संवादातून समजूत निघेल, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. जगातील सर्वात मोठ्या या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून प्रचंड मोठा रोजगार महाराष्टÑात निर्मित होईल. त्यातून राज्याचा व विशेषत: कोकण क्षेत्राचा अभूतपूर्व विकास पुढील काही वर्षात होईल. त्याला केवळ गैरसमजुतीतून विरोध होत आहे. त्याबाबत चर्चा केली जाईल. प्रकल्प बळजबरीने थोपवला जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेची समजूत काढू , प्रकल्प नाणारलाच! - धर्मेंद्र प्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:37 AM