शहरं
Join us  
Trending Stories
1
"टीम इंडिया'ला भारतात जाऊन ठोकून काढा, जिंकून या"; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला
2
सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण
3
एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."
4
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
5
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
6
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
7
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
8
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
9
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
10
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
11
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
12
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
13
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
14
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
15
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
16
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
17
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
18
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
19
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
20
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

चला संस्कृती जपू या ...

By admin | Published: November 20, 2014 1:03 AM

भारतातील संस्कृती ही अतिशय श्रीमंत समजली जाते. हडप्पा, मोहेंजोदाडो, तक्षशीला येथील उत्खननाद्वारे ही बाब जगमान्य झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नागपुरातील उत्खनन शाखेचे

जागतिक वारसा सप्ताह : हडप्पा ते गाविलगड संस्कृतीचा खजिना नागपूर : भारतातील संस्कृती ही अतिशय श्रीमंत समजली जाते. हडप्पा, मोहेंजोदाडो, तक्षशीला येथील उत्खननाद्वारे ही बाब जगमान्य झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नागपुरातील उत्खनन शाखेचे यात मोठे योगदान आहे. भारतीय उत्खनन शाखेने आजवर केलेल्या उत्खननाला भारतीय संस्कृतिक वारसाचे इंद्रधनुष्य म्हटले जाते. या सांस्कृतिक वारसाच्या इंद्रधनुष्याचे रंग नागपूरकरांनाही अनुभवता यावेत यासाठी आजवर करण्यात आलेल्या उत्खननाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हडप्पापासून ते सध्याच्या गाविलगडपर्यंतचा सांस्कृतिक वारसांचा खजिना या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. जागतिक वारसा सप्ताहनिमित्त भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उत्खनन शाखा - १ तर्फे १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान जुनी उच्च न्यायालयाची इमारत सिव्हिल लाईन्स येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परिसरात शाखेने आजवर केलेल्या उत्खननांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृतीबद्दल जगभरातील लोकांना वेगळेच आकर्षण आहे. हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन श्रीमंत असलेली संस्कृती मानली जाते. हडप्पा येथील उत्खनन हे सर्वात मोठे उत्खनन होते. सर मार्टिमर व्हीलर यांनी येथील उत्खननात सापडलेल्या वसाहतीचे ठिकाण आर - ३७ आणि काही दूर अंतरावर असलेल्या दफनस्थळ एच यांचे एकदुसऱ्यांशी संबंध स्पष्ट केले होते. या उत्खननातून अनेक महत्त्वपूर्ण अवशेष मिळाले होते. तसेच विविध दफन पद्धती उघडकीस आल्या होत्या. या ठिकाणी सापडलेल्या अनेक वस्तू आणि अवशेष या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. तसेच हडप्पा येथील उत्खननाच्या संपूर्ण परिसराचे मॉडेल प्रदर्शनात येणाऱ्यांचे सर्वप्रथम लक्ष वेधून घेते. हरियाणा फतेहाबाद जिल्ह्यातील भिरडाणा येथे झालेल्या उत्खननात हडप्पाकालीन चार सांस्कृतिक कालखंडाचे स्तर सापडले होते. यात हाकरा संस्कृती, पूर्व हडप्पा, पूर्व विकसित हडप्पा आणि विकसित हडप्पा असे त्याचे स्तर होते. या उत्खननात दैनंदिन वापराच्या मृद भांडी, कलाकुसरीच्या वस्तू, हाडांनी तयार करण्यात आलेली सुई, विविध प्रकारच्या मूर्ती आदी वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळतात. रोमन आणि चमकणारी मृदभांडी भारतातील दक्षिण-पूर्व सीमा क्षेत्र असलेल्या अरिकामेडू येथे १९४५ मध्ये उत्खनन करण्यात आले होते. येथील उत्खननात सापडलेल्या पुरातात्त्विक अवशेषांवरून भारत आणि रोमन देश यांच्यात व्यापारिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. येथील उत्खननात रोमन एम्फोरा, रोलेटेड आणि अरेटाईन मृदभांड्यांचे अवशेष सापडले होते. तसेच मध्य प्रदेश येथे १९५५-५६ या काळात ऊज्जैन येथील नगदा येथे करण्यात आलेल्या उत्खननादरम्यान ताम्रपाषाणिक काळातील विविध स्तरांसोबतच चमकणाऱ्या मृदभांड्यांचे अवशेष सापडले होते. हे अवशेषसुद्धा येथे आकर्षणाचे केंद्र आहे. लघुपाषाण ते सातवाहनकालीन अवशेषांचे अडम नागपुरातील अडम येथे १९८८-९२ दरम्यान पहिल्यांदा उत्खनन करण्यात आले. या ठिकाणी मृदभांड्यांरहित लघुपाषाण स्तरापासून तर ताम्रपाषाण, लोहयुग, पूर्व सातवाहन काळ आणि सातवाहन काळातील सांस्कृतिक वस्तू आढळून आल्या. या ठिकाणी सातवाहन काळातील किल्ल्यासारखे नगर आणि महत्त्वपूर्ण पुरातात्त्विक अवशेष आढळून आले. त्या काळातील मुद्रा(निधी)सुद्धा सापडली. त्यावर ब्राम्पी लिपीमध्ये ‘असीक जनपदस’ अंकित आहे. उत्खननात नागपूर कार्यालयाचे भरीव योगदान भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणांतर्गत भारतात करण्यात आलेल्या आजवरच्या उत्खननामध्ये नागपुरातील उत्खनन कार्यालयाचे मोठे योगदान आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अंतर्गत सर्वात पहिली उत्खनन शाखा -१ (फिल्ड आॅफिस) ची स्थापना करण्यात आली होती. १९४४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या शाखेचे कार्यालय दिल्लीत होते. १९५८ मध्ये या शाखेचे मुख्यालय नागपुरात स्थानांतरित करण्यात आले. संपूर्ण देश हा या कार्यालयांतर्गत येतो. नागपपुरातील उत्खनन शाखा -१ तर्फे तक्षशीला, अरिकामेडू, हडप्पा, ब्रह्मगिरी व चंद्रवल्ली, शिशुपालगड, हस्तिनापूर, रोपड, नागदा, उज्जैन, लोथल, जुनापाणी, कालीबंगन, कुचई, पैयमपल्ली, सिगनापल्ली, पवनी, मालवन, सूरकोटडा, पिप्रहवा, पकरोर, पवनी, मालवन, अडम, पचखेडी, मनसर, भिरडाणा, सन्नती आणि गाविलगड आदी ठिकाणी उत्खनन करण्यात आले असून तेथील प्राचीन काळातील ऐतिहासिक संस्कृती उघडकीस आणली आहे. प्रागेतिहासिक काळातील रेखाचित्रे प्राचीन काळातील मानव हे पहाडांमध्ये आपले आश्रयस्थान निर्माण करीत होते. सातपुडा पर्वतरांगांमधील गाविलगडच्या पहाडांमध्ये अशाच प्रकारची आश्रयस्थाने भारतीय पुरातत्त्व विभागाने शोधून काढली आहेत. सुसज्जीत असलेल्या या आश्रयस्थानांमध्ये विविध प्रकारची रेखाचित्रे काढण्यात आली असून काही कोरलेल्यासुद्धा आहेत. येथील आश्रयस्थानांना २१ प्रकारांमध्ये विभागण्यात आले आहे. तर यामध्ये रेखाटण्यात आलेल्या चित्रानुसार दोन श्रेणीत विभागणी करण्यात आलेली आहे. पहिल्या प्रकारात विविध रंगांचा वापर करून काढण्यात आलेली चित्रे आहेत. यात पांढरा, काळा आणि लाल रंगाचा वापर करून चित्रे काढण्यात आली आहेत. तर दुसऱ्या श्रेणीत उत्कीर्ण व कोरण्यात आलेल्या चित्रांचा समावेश आहे. या चित्रांचे विषय नैसर्गिक वातावरण, जीव-जंतू, वृक्ष, पशु-मानव, चिन्ह, आकृती, शिकारीचे दृश्य, युद्धातील दृश्य प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रागैतिहासिक काळापासून ते ताम्रपाषाण काळातील वस्तूही येथील उत्खनानत सापडलेल्या आहेत. गाविलगडमधील उत्खननाचे मॉडेल व तेथील चित्रे प्रदर्शनातील आकर्षणाचे केंद्र आहे.