मुंबई : म्हाडाने बांधलेल्या 2,641 घरांचे मालक उद्या (बुधवार) निश्चित होणार असून, त्यासाठी तब्बल 93 हजार 13क् इच्छुक रिंगणात आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये सकाळी 1क् वाजल्यापासून संगणकीय पद्धतीने सोडत काढली जाणार असून, निकालाचे थेट प्रक्षेपण ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाहता येणार आहे.
विविध कारणांमुळे रेंगाळलेल्या म्हाडाच्या या वर्षीच्या घरांच्या लॉटरीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, इच्छुक अर्जदारांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिका (पास) उपलब्ध केले जाणार आहेत. पहिल्या सत्रमध्ये मुंबई मंडळाच्यावतीने विविध विभागांत बांधलेल्या 814 सदनिका, तर दुस:या सत्रत कोकण मंडळाने विरार-बोळिंजमधील 1,716 व वेंगुल्र्यातील 111 घरांची सोडत काढली जाणार आहे. सोडतीच्या ठिकाणी गर्दी होण्याच्या शक्यतेमुळे सभागृहाच्या बाहेर मंडप उभारून त्या ठिकाणी निकाल पाहण्यासाठी बैठक व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर या वर्षी पहिल्यांदाच इच्छुकांना घरबसल्या इंटरनेटद्वारे सोडतीचे थेट प्रेक्षपण पाहण्याची उपलब्धता केली आहे. वेबकॉस्टिंगप्रणालीच्या माध्यमातून ही सुविधा करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)