शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची केंद्राकडून दखल , केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचे शिक्षण सचिवांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:23 AM

राज्यातल्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची दखल थेट केंद्राने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांनीच राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शिक्षण सचिवांना नुकतेच दिले आहेत.

मुंबई : राज्यातल्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची दखल थेट केंद्राने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांनीच राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शिक्षण सचिवांना नुकतेच दिले आहेत. यामुळे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्यासह राज्यातील अनेक शिक्षण संचालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुंबईतील विविध शाळा मिळून जवळपास १ हजार २४ असा ‘तुकडी घोटाळा’ झाला असून, याची चौकशी करावी, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून मुंबई शिक्षक लोकशाही आघाडीकडून (टीडीएफ) होत आहे. शालेय शिक्षण विभागातील बहुतांश अधिकारी हे पैसे घेतल्याशिवाय एकही फाईल सरकवत नाहीत. यामुळे मुंबईतील अनेक शिक्षकांना त्रास होत असल्याचा आरोप करत टीडीएफने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे केला. त्याची दखल घेत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे अवर सचिव एच. एम. सोनकेसरे यांनी या चौकशीचे तसेच त्याचे तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत.त्यांनी दिलेल्या या आदेशामुळे ‘तुकडी घोटाळ्या’सह शिक्षण विभागातील इतर घोटाळेही बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्यासह राज्यातील अनेक शिक्षण संचालकांच्या अडचणीत वाढ होतील, अशी चर्चा आहे.शिक्षण विभागातील अधिकारी स्वत: या शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारात सामील असल्याने त्याची चौकशी होऊ देत नाहीत. स्वत: सचिव आणि शिक्षणमंत्रीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे आम्हाला पंतप्रधान आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासाला पत्र लिहावे लागले. यापुढे तरी शिक्षण विभागातील या भ्रष्टाचाराची चौकशी होईल, अशी अपेक्षा आहे.- जनार्दन जंगले, अध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी

टॅग्स :educationशैक्षणिक