शिर्डी (जि. अहमदनगर) : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या एक लाखाच्या मदतीत वाढ करून पाच लाख रुपये करण्याचे आश्वासन सभागृहात देऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत महसूलमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला जाईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.विखे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात १३ मार्च २०१५ रोजी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या मदतीबाबत सूतोवाच केले होते. खडसे यांचे मंत्रिपद गेल्याने महसूल खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे.सभागृहातली माहिती सभागृहाची व जनतेची दिशाभूल करणारी आहे. (प्रतिनिधी)
महसूलमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग - विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2016 5:15 AM