शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बलात्कार प्रकरणातील चौघा नराधमांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:06 IST

नागपूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया चार नराधम आरोपींना मकोका कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नागपूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया चार नराधम आरोपींना मकोका कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना २४ मे २०१५ रोजी रात्री टीबी वॉर्ड परिसरातील निर्जन भागात घडली होती. आरोपींना ९० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, त्यातील ५० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी दिला.गणेश रामदास सातपुते (२७), करुणानंद रमेश मून (२७), रोहित संजय तांबे (२७) व नितीन प्रीतम बैरीसाकू (२८) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी इंदिरानगर येथे आई, वडील व दोन बहिणींसोबत राहात होती. ती सक्करदरा येथे एका डेव्हलपर्सच्या कार्यालयात काम करीत होती. घटनेच्या दिवशी घरी परतत असताना तिला क्रीडा चौकात तिचा मित्र राहुल ऊर्फ आदित्य ऊर्फ रियांश रमेश निनावे भेटला. त्यामुळे दोघेही मिळून घराकडे जात होते. दरम्यान, टीबी वॉर्ड परिसरात आरोपींनी त्यांना थांबवले. त्यांनी निनावेला शिवीगाळ व मारहाण करून हाकलून लावले. त्यानंतर मुलीला निर्जनस्थळी नेऊन सामूहिक बलात्कार केला. याबद्दल वाच्यता केल्यास आई-वडिलांना ठार मारून टाकू, अशी धमकीही मुलीला दिली होती. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.>अत्याचार प्रकरणात तिघांना कारावासअमरावती : दहावीच्या परीक्षेला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये दोघांना दहा वर्षांची, तर त्यांना मदत करणाºया एकाला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. राहुल ऊर्फ गोलू राजू रावेकर (२४), संदीप रामदास रावेकर (२४), मंगेश विष्णू कुकडे (२४) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. खोलापूर (ता.भातकुली) येथील १५ वर्षीय मुलगी २४ मार्च २०१४ रोजी दहावीच्या पेपरसाठी गेली होती. मंगेश कुकडेने तिला पळवून अकोला येथे राहुलजवळ पोहचविले. राहुलने तिला अहमदाबादला नेऊन तेथे लैंगिक अत्याचार केले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर