शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

आयुष्याचाच झालाय तमाशा!

By admin | Published: February 21, 2016 2:39 AM

महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी

- प्राची सोनवणे, नवी मुंबई महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या एका तमाशा महोत्सवाच्या अंतर्गत तमाशा मंडळांना ५१ हजार रुपयांची बिदागी दिली जाते. मिळालेल्या पैशांमध्ये उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने या कलाकारांना गावातील सावकाराकडून ३ ते ४ टक्के दराने कर्ज काढावे लागते. वाशी येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१६निमित्त तमाशा कलावंतांशी चर्चा केली असता आमच्या आयुष्याचाच तमाशा झाल्याचे वक्तव्य कलाकारांनी केले. कला जिवंत ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे हे शासन लोककलेला मात्र जिवंत ठेवण्यात निष्क्रिय ठरत आहे. वर्षातले चार-पाच माहने गावोगावी हिंडावे, बाजार-जत्रांत तमाशाचे खेळ करावेत, मिळतील ते पैसे जमवावेत आणि त्यातून वर्षभर कुटुंबाची भूक शमवावी लागते. ही व्यथा आहे तमाशा कलावंतांची. वर्षानुवर्षापासूनची ही कला आता पार कालबाह्य होत चालली असून, कलाकारांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून राज्यात तमाशाची दहा-पंधरा मोठी मंडळे उरली आहेत. दसरा ते अक्षय्यतृतीया असे सहा-सात महिने त्यांचे कार्यक्र म होतात. छोटी मंडळे मात्र गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंतच तमाशा करतात. नाशिक जिल्ह्यात अशा विसेक पार्ट्या आहेत. महाशिवरात्रीनंतर त्यांच्या सुपाऱ्या ठरण्यास प्रारंभ होतो आणि तारखा ठरवल्या जातात. जिथली सुपारी असेल त्या गावी दोन ट्रक, दोन बसेससह दुपारी पोहोचावे, साहित्य उतरवावे, तंबू, स्टेज उभारावेत, रात्री पाचेक तासांचा तमाशा संपल्यावर मध्यरात्री पोटात चार घास ढकलावेत आणि जमिनीला पाठ टेकावी... दुसऱ्या दिवशी सकाळी पुढल्या गावाच्या दिशेने प्रवास करायचा, असा या कलावंतांचा दिनक्र म. तमाशात गण, गवळण, रंगबाजी (लावण्या, नृत्ये), वगनाट्य सादर केले जाते. ‘फार्स’ (विनोदी नाटिका) सादर केली जाते. गायक, वादक, नर्तक, वगनाट्यातील अभिनेते, सोंगाड्या, बिगारी, आचारी, ड्रायव्हर या साऱ्यांना सोबत घेऊन गावोगावी तमाशा सादर केला जातो. ‘कार्यक्र म रंगला नाही’असे कारण पुढे करीत तमाशाच्या आयोजक मंडळींकडून अनेकदा ठरलेले पैसेही दिले जात नाहीत, अशा अनेक व्यथा कलाकांनी मांडल्या. अनेक कार्यक्र म करूनही काही वेळेस जेवणासाठीही पैसा शिल्लक राहत नसल्याची माहिती महिला कलाकारांनी दिली. वेतन देणे मालकाला परवडत नाही. कलावंतांना मोसम सुरू होण्यापूर्वी ठिकठिकाणाहून खास सरावासाठी महिनाभर आधी बोलवावे लागते. त्यांची निवास-भोजनाची व्यवस्था करावी लागते. महोत्सवातही गैरसोयीवाशी रेल्वे स्थानकाजवळी मैदानावर आयोजित या महोत्सवात परगावाहून आालेल्या कलावंतांसाठी शौचालयाची व्यवस्था देखील केलेली नसून, महिला कलाकारांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तान्ह्या मुलांचे हालतमाशा फडातील कलाकारांची तान्ह्या मुलांना रात्रीच्या वेळी रिकाम्यापोटी झोपावे लागते. कार्यक्रमात कला दाखविणाऱ्या कलाकारांना त्यांच्या मुलांकडे पाहायला सुद्धा वेळ मिळत नाही. दिवसभर आईवडिलांसोबत उन्हातान्हात भटकून दमलेल्या या जीवांना कित्येकदा रात्र उपाशीपोटी काढावी लागते. कार्यक्रम सुरू असताना अडचण होऊ नये म्हणून बाजूला सारलेली ही मुले कधी झोपी जातात याचीही खबर नसते.गावोगावी फिरस्तीवर असणारी या कुटुंबातील पोरंबाळं मात्र शिक्षणापासून वंचित राहतात. यामधील ९५ टक्के मुलांचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेले नाही.महिला कलाकारांशी संवाद साधला असता महिला नृत्यांगना छाया काटे यांनी महिला कलाकारांना समाजाचा तिरस्कारही सहन करावा लागतो. रस्त्याने चालतानाही ‘तमाशावाली’ किंवा ‘नाचणारी’ आली, असे टोमणे ऐकावे लागतात. त्यांच्याकडे हमखास वाईट नजरेने पाहिले जाते. कलावंतांची शासनाकडून दखलही घेतली जात नाही. कलावंतांची ही उपेक्षा पाहता म्ािहलावर्ग, वादक यांनी मात्र या लोकक लेकडे पाठ फिरविली आहे. कार्यक्रमाचा रोजचा खर्च ४० ते ४५ हजार रुपये इतका असून, एवढा पैसा उभारायचा तरी कसा, यातून काही शिल्लक राहतच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी कसा करणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही कलावंतांना न परवडणाराच आहे. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी कलावंतांच्या समस्या आधी सोडविल्या पाहिजेत.- भीमराव गोपाळ, संचालक, भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, सांगवी