मुंबई : रुळावरील धावते रुग्णालय अशी ओळख असलेली ‘लाईफलाईन एक्स्स्प्रेस’ आता कोकणात दाखल झाली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झालेल्या लोकलचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २८ मार्चला होईल. ट्रेन रुळावरुन घसरणे, दोन ट्रेनची धडक या व अन्य कारणांमुळे अपघात होतात. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी म्हणून सुविधांनी युक्त ‘लाईफलाईन एक्स्प्रेस’ सुरु करण्यात आली. आता ती कोकणातील आली असून २९ मार्च ते १७ एप्रिलपर्यंत रत्नागिरी स्थानकात थांबेल. यावेळी पोलिओ, कान, दातांची तपासणी, कॅन्सर उपचार माहिती देण्यात येईल. (प्रतिनिधी)
‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ कोकणात
By admin | Published: March 28, 2017 3:50 AM