निलंगा तालुक्यातील अंबुलगा परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे़
दुपारी २ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात निलंग्यात अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ १० मिनिटे गाराही पडल्या़
चाकूर शहरात शुक्रवारी दुपारी गारांचा पाऊस झाला़
वादळी वाऱ्यामुळे चाकूर शहरातील नगरपंचायतीसमोरील बाभळीचे झाड कोसळून चार दुकानांचे शुक्रवारी नुकसान झाले़
तालूर येथे शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु झाला़.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी निटूर चाकूर येथे गारा पडल्या़.