लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : माजी मंत्री प्रकाश आवाडे हे भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबतचे सुतोवाच त्यांनी आज, मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होणाºया अन्यायाची दखल प्रदेश कॉँग्रेसकडून घेतली जात नाही. जिल्हा कॉँग्रेसकडून ज्येष्ठ नेतृत्वाचा झालेल्या अपमानाकडेही दुर्लक्ष केले जाते. असे अनेक प्रसंग अनुभवल्यामुळे कॉँग्रेसपासून फारकत घेण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामुळेच आपण जिल्हा ताराराणी आघाडीचे काम सुरू केले, असे सांगतानाच प्रकाश आवाडे यांनी ‘भाजप’मध्ये प्रवेश मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ, असे स्पष्ट केले.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रकाश आवाडे यांनी मुंबईत भेट घेतली. राणे यांच्या निवासस्थानी सोमवारी सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे समजते. राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि प्रकाश आवाडे यांची कॉँग्रेससोबत नाराजी अशा पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात त्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आवाडे यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश असा राजकीय क्षेत्रात समजही निर्माण झाला.अशा पार्श्वभूमीवर आवाडे पत्रकारांशी बोलत होते. भाजप प्रवेशाला त्यांनी होकारही दिला नाही किंवा इन्कारही केला नाही. ते म्हणाले, मी राणे यांची भेट घेतली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर आम्ही बोललो. मात्र, सध्या जिल्ह्यात ताराराणी आघाडीचे काम करीत आहे; पण येथून पुढे कॉँग्रेस पक्षाचे काम करणार नाही, असा माझा निर्धार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार सुरेश हाळवणकर आपल्या भाजप प्रवेशाला अनुकूल आहेत; पण आमचे कार्यकर्ते जे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर आहेत, त्यांच्याशी बोलूनच भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाईल.दरम्यान, आवाडे यांच्या भाजप प्रवेशाबाबत शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक यशवंत प्रोसेसर्समध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या उपस्थितीत झाली. कॉँग्रेस प्रवेशाबाबत अनुकूल व प्रतिकूल अशी दोन्ही प्रकारची मते प्रमुख पदाधिकाºयांनी व्यक्त केली. बैठकीस अशोक सौंदत्तीकर, अशोकराव आरगे, धोंडीलाल शिरगावे, सतीश डाळ्या, बाळासाहेब कलागते, रणजित जाधव, शेखर शहा, स्वप्निल आवाडे, चंद्रकांत पाटील, महंमदरफिक खानापुरे, आदी उपस्थित होते.खासदार शेट्टींना मंत्रिपद : खासदार राजू शेट्टी यांना मंत्रिपद मिळाले, तर ते त्याचा उपयोग शेतकºयांच्या भल्यासाठी करतील. शेतकरी चळवळीच्यादृष्टीने ही चांगलीच गोष्ट आहे, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.कॉँग्रेसची उबग आलीयसन १९६८ मध्ये कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याने कॉँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी मनाची तयारी होत नव्हती; पण जिल्हा कॉँग्रेसकडून पदोपदी होणारा अपमान, निर्णायक क्षणी डावलले जाणे, अशा मानहानिकारक वागविण्यामुळे कॉँग्रेसपासून उबग आलीय.
प्रकाश आवाडे हातात ‘कमळ’ घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:21 AM