पुणे : राज्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पहिल्या पेरण्या बहुतांश भागात वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच, दुबार पेरणीचीही वेळ टळत चालली आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाऊन शेतकरी आता थेट रब्बीचीच पेरणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागानेही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.राज्यात ८३ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या. मात्र, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बहुतांश भागातील पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने पीक विम्याची मुदत ७ आॅगस्टपर्यंत वाढवली. तरीही बहुतांश भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना आता पीक विम्याचाही लाभ घेता घेईल की नाही याबाबत साशंकता आहे. या आठवड्यात पाऊस झाला तरी वाढीव मुदतीत पीक विम्याचा लाभ घेता येणे शक्य दिसत नाही.दरम्यान, पावसाअभावी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत बुधवारी मुख्यमंत्री, मुख्य सचिव हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर संवाद साधणार असल्याचे समजते. कृषिमंत्री व राज्यमंत्रीही या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
दुबार पेरणीची शक्यता मावळली
By admin | Published: August 05, 2015 1:15 AM