शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

By admin | Published: June 21, 2016 3:33 AM

अकरावी आॅनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सोमवारी प्रदर्शित करण्यात आली. याआधी अर्जांमध्ये भरलेली माहिती विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर

मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सोमवारी प्रदर्शित करण्यात आली. याआधी अर्जांमध्ये भरलेली माहिती विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर अ‍ॅप्लिकेशन आयडीद्वारे तपासता येणार आहे. शिवाय त्यात आवश्यकतेनुसार बदलही करता येणार आहेत.ज्या विद्यार्थ्यांना अर्जात भरलेल्या माहितीत बदल करायचा असेल, त्यांनी संबंधित शाळेशी किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज रिसेट करून अ‍ॅप्लिकेशन आयडी व पासवर्ड वापरून नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.चव्हाण यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज आॅनलाईन सादर केला नसेल, त्यांना प्रवेश प्रक्रियेचा भाग १ निश्चित करून कन्फर्म करता येईल व भाग २ कन्फर्म करून अर्ज आॅनलाईन सादर करता येईल. तर अल्पसंख्याक, इन-हाऊस किंवा व्यवस्थापन कोट्यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ भरला नसेल, तर तो भरून कन्फर्म करणे आवश्यक आहे. २१ व २२ जून या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना हे बदल करता येतील. (प्रतिनिधी)सहा विद्यार्थ्यांना १०० टक्के सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार एकूण २ लाख १७ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ५८९ आहे. त्यात २ हजार ०६० विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले आहेत. तर ६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत.