शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

अकरावीची दुसरी विशेष गुणवत्ता यादी जाहीर

By admin | Published: August 23, 2016 8:05 PM

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता.

२२,२७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी,  तिसऱ्या फेरीसाठी ४० हजार ४८१ जागा शिल्लक

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता. त्यापैकी एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश बदल देण्यात आला असून, ३ हजार ४५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेषफेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुसऱ्या विशेष फेरीसाठी अकरावीच्या एकूण ६२ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यातील २२ हजार २७३ जागांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ९ हजार ९१० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, तर ३ हजार १६२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि २ हजार ८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. त्यामुळे एकूण १५ हजार ८० विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमामधील महाविद्यालयात प्रवेश देण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरी सुमारे ७ हजार १९३ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमामधील महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तिसऱ्या विशेष फेरीमध्ये पुन्हा अर्ज करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पहिल्या तीन पसंतीक्रमातील महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसोबत दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेश बदलाच्या संधीपासून वंचित राहिलेल्या ३ हजार ४५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेष फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जुलै महिन्यात पार पडलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतरच तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यताआहे. तरी अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीसाठी अद्याप ४० हजार ४८१ जागा उपलब्ध आहेत.दहीहंडीच्या सुटीने प्रवेश वेळापत्रकात बदलजुन्या वेळापत्रकानुसार, दुसऱ्या विशेष फेरीमधील गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे बुधवार व गुरुवारी म्हणजेच २४ आणि २५ आॅगस्ट रोजी संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे होते. मात्र राज्य शासनाने मुंबई शहर आणि उपनगरांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना गुरुवारी, २५ आॅगस्ट रोजी दहीहंडीनिमित्त सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी प्रवेश प्रक्रिया होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी २५ आॅगस्टऐवजी शुक्रवारी, २६ आॅगस्टला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखानिहाय निश्चित करण्यात आलेले प्रवेश :कला १,४४०वाणिज्य १४,३८१विज्ञान ६,४५२एकूण २२,२७३