मुंबई- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एक तासाभरात द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. उच्च न्यायालयाला मोलभाव ठरवण्याचा मंच समजू नका, असं म्हणत न्यायालयानं स्पष्ट शब्दांत डी. एस. कुलकर्णींवर ताशेरे ओढले आहेत.गेल्या तीन सुनावणीदरम्यान तुम्ही मुदत वाढवून घेऊन फक्त न्यायालयाची दिशाभूल केली आहे. इतक्या वर्षात कमावलेला रोख नफा थकीत रकमेच्या 25% म्हणून तातडीनं जमा करा, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गुंतवणूकदारांना फसविण्याचा कोणताही इरादा नाही. आमच्याकडे एकूण 48 लाख चौरस फूट एवढी मालमत्ता आहे. ज्यांच्या मुदतठेवीची मुदत पूर्ण झाली अशी 209 कोटींची थकबाकी आहे. जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत 30 कोटींचे वाटप केले आहे. 1600 नागरिकांनी आमची नवी योजना स्वीकारली आहे. मार्च 2018पर्यंत आम्ही सर्वांचे पैसे देऊ शकू व सर्व सुरळीत करू, असं आश्वासन डी. एस. कुलकर्णींनी दिलं होतं.
काम पूर्ण केले नाही तर पैसे गेले कोठे? डीएसके यांनी आमच्या इमारतीचे काम पूर्ण केले नाही, तर ते पैसे गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अनेक गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, डीएसके यांच्याकडे फ्लॅट घेताना कर्ज घेतलेल्यांना टाटा फायनान्स कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीने कायदेशीर नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे.
ना घर का ना घाटकाडीएसके यांच्या ‘आधी घर पैसे नंतर’ या योजनेनुसार फ्लॅट बुक केलेल्यांना डिसेंबर 2016मध्ये ताबा मिळणार होता. त्यानंतर कर्जाचा मासिक हप्ता सुरू होणार होता. तोपर्यंतचा हप्ता डीएसके भरणार होते. त्यांनी तो न भरल्याने फायनान्स कंपन्यांनी फ्लॅटधारकांच्या खात्याला अॅटॅचमेंट लावली आहे. त्यांनी आगाऊ दिलेले धनादेश बँकेत भरले. ते न वटल्याने त्यांना आता कायदेशीर नोटिसा येऊ लागल्या आहेत. त्यांच्या खात्यातून चेक न वटता परत गेल्याने ते डिफॉल्टर ठरल्याने त्यांचे क्रेडिट रेटिंग कमी झाले आहे. आता त्यांना दुस-या कोणत्याही कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते त्यासाठी अपात्र ठरू शकतील.डीएसके चिटर नाहीत- राज ठाकरेडीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहन राज ठाकरेंनी गुंतवणूकदारांना केलं आहे.