लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून शहरातील २९ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे, या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण मंडळाकडून ज्या शाळा अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत, त्या शाळेच्या व्यवस्थापनाने तत्काळ बंद कराव्यात. या शाळा बंद न केल्यास बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनधिकृत घोषित करण्यात आलेल्या शाळा पुढीलप्रमाणे :अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल (धनकवडी), फक्कडराव थोरावे प्राथ. शाळ (अप्पर बिबवेवाडी), रोझरी स्केल (टिंगरेनगर), सेंट पीटर्स स्कूल (धानोरी), अंकुर विद्यामंदिर (शिवाजीनगर), अॅक्टिव्ह इंग्लिश मीडियम (कोंढवा), इमॅन्यूअल पब्लिक स्कूल (कोंढवा), उम्मत पब्लिक स्कूल (कोंढवा), टिन्स लँड इंग्लिश प्राय. स्कूल (कोंढवा), दर ए अरकम इंग्लिश प्राय. स्कूल (कोंढवा), दर ए अरकम उर्दू प्राय. स्कूल (कोंढवा), पर्ल ड्रॉप स्कूल (कोंढवा), अल नूर न्यू हॉरिझोन स्कूल (कोंढवा), फिदा ए मिल्लत इंग्लिश स्कूल (कोंढवा), ज्ञान प्रबोधिनी विद्यामंदिर (काळेपडळ), सेंट झेव्हिअर (विठ्ठलवाडी), आदर्श प्राथ. विद्यालय (वडगाव), गोल्डमाइन इंटरनॅशनल स्कूल (वडगाव), ब्लूमिंग बर्ड (दळवीवाडी), रोझरी स्कूल (कर्वेनगर), द होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल (खराडी), न्यू झेन्सिर स्कूल (खराडी), न्यू विज्डम इंटरनॅशनल (चंदननगर), रेडक्ल्फि स्कूल (संजय पार्क, विमाननगर), महात्मा गांधी (संजय पार्क, विमाननगर), ई कोल हेरिटेज (औंध), अॅम्रो स्कूल (धनकवडी), तुकानुसया सेकंडरी स्कूल (साईनाथनगर).
अनधिकृत शाळांची यादी जाहीर
By admin | Published: June 05, 2017 1:34 AM