शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

साहित्य संमेलनाची वारी यंदा संत नामदेवांच्या कर्मभूमीत!

By admin | Published: July 02, 2014 4:45 AM

यंदा प्रथमच मराठी साहित्यिकांची वारी महाराष्ट्र व त्याच्या आजूबाजूच्या राज्यांपासून दूर संत नामदेवांच्या कर्मभूमीत निघणार आहे

पुणे : यंदा प्रथमच मराठी साहित्यिकांची वारी महाराष्ट्र व त्याच्या आजूबाजूच्या राज्यांपासून दूर संत नामदेवांच्या कर्मभूमीत निघणार आहे. ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान गावात होणार असल्याचेअ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी जाहीर केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागताच स्थळ हा साहित्यिकांपासून ते साहित्यप्रेमींपर्यंत सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय असतो. यंदाच्या संमेलनस्थळाने उत्सुकता शमवत ओढ वाढविण्याचे काम अधिक केल्याची चर्चा आहे. यंदा प्रथमच अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी देशातील १० ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. त्यात उस्मानाबाद, बडोदा व पंजाब यांचा समावेश होता. त्यापैकी उस्मानाबाद व पंजाब या दोन ठिकाणांची पाहणी स्थळ निवड समितीने केली आणि पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाटला तालुक्यामधील घुमान गावाची निवड करण्यात आली.‘सरहद’ संस्थेचे संजय नहार हे या नियोजित संमेलनाचे संयोजक असून भारत देसडला हे निमंत्रक असतील. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे संमेलन होण्याची शक्यता असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. घुमान येथे मराठी लोक नसले तरी अमृतसर, चंदीगड, लुधियाना आदी ठिकाणी सुमारे ५००० मराठी लोकसंख्या असल्याचे वैद्य यांनी सांगितले. नहार म्हणाले, अद्याप अधिकृतरीत्या आम्हाला कळविलेले नाही. मात्र हे संमेलन आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळत असल्याचा आनंद आहे. घुमानमध्ये विकास व्हावा, तेथे मराठी वाढावी तसेच राष्ट्रीय तीर्थस्थान म्हणून त्या ठिकाणाला ओळख मिळावी, म्हणून आमचे कायमच प्रयत्न होते. (प्रतिनिधी)