अहमदनगर : ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे हे चुकीचे काय बोलले, असा प्रतिप्रश्न करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी नेमाडेंना अप्रत्यक्ष टोला लगावत ‘‘होय, साहित्य हे रिकामटेकड्यांचेच काम असते़ कामात व्यस्त असणारे साहित्याची सेवा करूच शकत नाहीत़ नेमाडे यांचे बोलणे म्हणजे शिवी नसून ओवी आहे,’’ अशी उपहासात्मक टीका डॉ़ मोरे यांनी गुरुवारी केली़डॉ़ मोरे म्हणाले, ‘‘साहित्याला उत्सवी स्वरूप असावे तरच ते लोकांना भावेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल़ साहित्य सेवा ही खऱ्या अर्थाने रिकामटेकड्या लोकांचेच काम आहे़ आपापल्या कामांत व्यस्त असणारे कधी साहित्य संमेलनात फिरकले आहेत काय, असा सवाल करीत आपापल्या कामांत व्यस्त असणारे साहित्याची सेवा करूच शकत नाहीत़ साहित्य सेवेसाठी वेळ द्यावा लागतो़ त्यामुळे साहित्य हे रिकामटेकड्या लोकांचेच काम आहे़’’ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे घेण्याबाबत ते म्हणाले, ‘‘घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी आहे़ त्यांना वंदन करण्यासाठीच हे साहित्य संमेलन तेथे घेत आहोत़ यात वावगे काही नाही़ ज्यांना यायचे त्यांनी यावे़ पुस्तक विकण्यासाठी आणि प्रकाशकांसाठी हे साहित्य संमेलन नाही,’’ असेही डॉ़ मोरे यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी) च्विकासाच्या नावाखाली वेगळ्या राज्याची मागणी चुकीची आहे़ उद्या कोणी वेगळा देश मागेल मग काय करायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़च्प्रत्येक जण मुलाला इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि मराठी शाळा टिकविण्याची वरवर चिंता व्यक्त करतो, हे चुकीचे असल्याचे डॉ़ मोरे म्हणाले़
साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचाच उद्योग!
By admin | Published: January 09, 2015 1:23 AM