शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

लावणीच्या नजाकतीत रंगल्या सखी

By admin | Published: April 20, 2016 12:58 AM

‘माझ्यावरती रसिकजनांच्या खिळल्या किती नजरा’, ‘सोडा राया सोडा हा नाद खुळा’, ‘ही पोरी साजूक तुपाची’ अशा एकाहून एक सरस उडत्या चालीच्या गाण्यांवर सादर झालेल्या लावण्यांनी सखींना मोहिनी

पुणे : ‘माझ्यावरती रसिकजनांच्या खिळल्या किती नजरा’, ‘सोडा राया सोडा हा नाद खुळा’, ‘ही पोरी साजूक तुपाची’ अशा एकाहून एक सरस उडत्या चालीच्या गाण्यांवर सादर झालेल्या लावण्यांनी सखींना मोहिनी घातली. प्रत्येक लावणीगणिक सखींचा उत्साह द्विगुणित होत गेला आणि सरतेशेवटी त्यांनीच या गाण्यांवर ठेका धरत आपल्यातील नृत्यकलेला वाट करून दिली.निमित्त होते सुरश्री प्रोडक्शन आणि लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार’ या अनोख्या लावणी कार्यक्रमाचे. आपल्याकडील पुरुषप्रधान संस्कृतीत लावणी, तमाशाचा आनंद हीसुद्धा पुरुषांची मक्तेदारी समजली जात असताना ‘लोकमत सखी मंच’ने या गैरसमजुतीला फाटा देत महिलांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. ५००० हून अधिक महिलांनी लावणीच्या या बहारदार कार्यक्रमाला हजेरी लावत सायंकाळ ‘लावणी’मय केली. लावणीतील प्रथेप्रमाणे मुजऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरेखा पुणेकर यांच्यासमवेत कार्यक्रमातील सर्व महिला कलावंतांनी मोहक अदांनी मुजरा सादर करत सर्वांना मोहिनी घातली आणि कार्यक्रम रंगतदार होणार असल्याची जणू नांदीच दिली. त्यानंतर ‘कन्हय्या, ये रे कन्हय्या’ या गवळण सादर केली. पारंपरिक बाजातला मुजरा, परंतु नव्या काळातले सादरीकरण करत ‘माझ्यावरती रसिकजनांच्या’ या लावणीने काळजाचा ठाव घेतला. ‘एकवीरेची पहाट होतेय’, ‘या कोळीवाड्याची मान, आई तुला देऊन’ अशा गाण्यांमधून देवीला साकडे घालण्यात आले. ‘पप्पी दे पारोला’, ‘गढुळाचं पाणी कशाला ढवळीलं’, ‘ही पोरी साजूक तुपातली’, ‘जरा सरकून बसा’, ‘घंटी मी वाजवली’, ‘तुझी चिमणी उडाली भुर्र’ या गाण्यांनी महिलांना मोहिनी घातली आणि नेहमीच्या कामाच्या रगाड्यातून बाहेर पडून आनंदाचे काही क्षण व्यतीत करण्याची संधी दिली. सुनील गोडांबे, दीपक काळे, जगन्नाथ, महेश लोखंडे यांनी लावण्यांना उत्तम साथसंगत केली.