मुंबई : राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अशासकीय सदस्यांची राज्य शासनाने आज तीन वर्षांसाठी नियुक्ती केली. त्यात २१ साहित्यिक, पत्रकारांचा समावेश आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, डॉ. शामा घोणसे (समीक्षक), लक्ष्मीनारायण बोल्ली (ललित लेखक), डॉ. विनय सहस्त्रबुध्दे (मानव्यविद्या क्षेत्रातील तज्ज्ञ), दीपक घैसास (तंत्रज्ञान क्षेत्र), राजेंद्र साहेबराव दहातोंडे (कृषिविज्ञान), प्रा. अरुण यार्दी (महाराष्ट्राबाहेरील मराठीच्या प्राध्यापकांचे प्रतिनिधी), रेणू दांडेकर (शिक्षणशास्र), अमर हबीब, डॉ. उदय निरगुडकर (प्रसार माध्यम), डॉ. विद्यागौरी टिळक (महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या मराठी विभागाच्या प्रतिनिधी), अनय जोगळेकर (मराठी संस्था), डॉ. भारत देगलूरकर (महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्थांचे प्रतिनिधी), सोनल जोशी कुलकर्णी (भाषा विज्ञान), डॉ. रंजन गर्गे (विज्ञान), नंदेश उमप (लोकसंस्कृती), डॉ. अविनाश पांडे (भाषाविज्ञान), श्रीराम दांडेकर, (महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापार व्यवस्थापक यांचे प्रतिनिधी),कौशल इनामदार (रंगभूमी, प्रयोगकला व चित्रपट), शिवाजीराजे भोसले (बृन्महाराष्ट्र परिषदेने नियुक्त केलेले प्रतिनिधी), रेखा दिघ (जागतिक मराठी परिषदेच्या प्रतिनिधी)
मराठी विकास संस्थेवर साहित्यिक, पत्रकार नियुक्त
By admin | Published: October 28, 2015 2:08 AM