शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

साहित्यिक नंदा खरेंनी नाकारला साहित्य अकादमी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 9:11 PM

नंदा खरेंना उद्या या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

मुंबई: साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र खरे हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याची माहिती मिळत आहे. कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही अशी भूमिका खरेंनी २०१४ मध्ये घेतली. त्यामुळे खरे साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारणार नाहीत.साहित्य अकादमीनं आज २० भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यात ७ कविता संग्रह, ४ कादंबरी, ५ कथा संग्रह, २ नाटकं आणि प्रत्येकी एका स्मरणिकेचा आणि महाकाव्याचा समावेश आहे. नंदा खरेंच्या उद्या कादंबरीची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. मात्र हा पुरस्कार खरेंनी स्वेच्छेनं नाकारला आहे.समाजाकडून आतापर्यंत मला भरपूर मिळालं- खरेआज दुपारी ३.३०-४ च्या दरम्यान मला निरोप मिळाला की माझ्या "उद्या" ह्या जानेवारी २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. चार एक वर्षापूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळालं आहे व यापुढेही घेत राहणे मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मी मांडत आहे.