मुंबई - राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी ( 15 जुलै ) रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले.
Live Updates -
- सोलापूर : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, टँकरमधील दूध सोडण्याच्या प्रकारानंतर आता गवळी कार्यकर्त्याच्या रडारावर
- कुरघोमध्ये दूध संकलन करणाऱ्या गवळ्याचे दूध रस्त्यावर सांडले
- संग्रामपूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वरवट बकाल येथील बस थांबा रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला
- दुधाच्या प्रश्नी विधानपरिषद २० मिनिटे तहकूब
- दूध अनुदानावरून विरोधकांचा विधानसभेत सभात्याग
- शालेय पोषण आहारात दुधाच्या पदार्थांचा समावेश व्हावा – सुनील प्रभू
- विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू
- विरोधकांनी आवाज उठवल्याने विधानसभेत गोंधळ, कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब
- दूधाच्या प्रश्नावरून विरोधक विधानसभेत आक्रमक
- सरकारने बळाचा वापर करुन दूध उत्पादकांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करु नये किंवा तशी धमकीही देऊ नये - विखे-पाटील
- राज्यात शेतकऱ्यांवर दडपशाही झाली तर त्याची जबर किंमत सरकारला मोजावी लागेल, हे सरकारने ध्यानात ठेवावे - विखे पाटील
- कोल्हापूर : गोकुळ संघाचं दूध मुंबईकडे रवाना, पोलीस बंदोबस्तात गोकुळचे 12 टँकर मुंबईला रवाना
- राजू शेट्टींसोबत चर्चा करण्यास तयार पण ते चर्चा करत नाहीत - मुख्यमंत्री
- राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार- राधाकृष्ण विखे-पाटील
- हुन्नूर ता.मंगळवेढा येथे हनुमान मंदिरात मुर्तीवर दुधाचा अभिषेक करून संपाला सुरुवात, दूध उत्पादक शेतकऱ्यांचं रस्त्यावर दुध ओतून आंदोलन सुरू
- माढा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
- अहमदनगर : सोलापूर रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग
- सोलापूर : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी आक्रमक, नेचर दुध कंपनीच्या दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फोडल्या
- जळगाव : चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन, रस्त्यावरच ठिय्या मांडत एक तास रोखून धरला रस्ता
- दूध दरवाढ आंदोलनामुळे राजहंस, प्रभातसह सर्वच दूध संकलन आणि वितरण बंद राहणार
- क्रांती, माऊली, मातोश्री, सोनईच्या गाड्या फोडल्या
- पुण्यात दुधाच्या पाच गाड्या कार्यकर्त्यांनी फोडल्या
- बुलडाण्यात दूध दरवाढ आंदोलनाला हिंसक वळण
- सौराष्ट्र एक्स्प्रेसला अमूल दुधाचा डबा जोडला नाही
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे पडसाद
- सांगोल्यात महूद येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध
- आंदोलनाचा मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम नाही
- अमरावतीत दूध टँकर फोडण्याचा प्रयत्न
- कोल्हापूरात शिरोळमध्ये दूध बंद आंदोलन
- नगरमधील दूध संकलन, वितरण आज बंद राहणार
- वरवंड टोलनाक्यावर टँकरमधील दूध ओतलं
- करमाळा : केम येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन सुरू केले
- गोकूळ दुध संघाकडून आज दूध संकलन बंद
- गोकुळ दुध संघाचा राजू शेट्टीच्या आंदोलनाला पाठिंबा
- वैजापुरात दूध आंदोलन तापले
- दुधाला प्रतिलिटर ५ रुपये दरवाढ मिळावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची मागणी
- संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी संगमनेरवरुन औरंगाबादला जाणारा दुधाचा आयशर टेम्पो तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे रविवारी रात्री फोडला.
- दूध दरावाढीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी नंतर त्या टेम्पो मधील दुधाचे संपूर्ण केरेट रस्त्यावर फेकले.
- मुंबई आणि उपनगरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी वारणाकडून तयारी
- वारणा दूध महासंघाकडे 3 दिवस पुरेल एवढा साठा
- मुंबईला होणाऱ्या दूध पुरवठ्याची पॅकिंगही पूर्ण, वारणा मुंबईत दररोज 2 लाख लिटर दूध पुरवठा करते
- रविवारी रात्री १२ वा. ग्रामदैवतांना अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दूध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले.
- पोलिसांनी रविवारी दुपारी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. त्यांच्याकडून शपथपत्रे लिहून घेतली.
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडून दिले.
- -खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले.
- पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच संघांनी सोमवारी दूध संकलन बंदचा निर्णय घेतला आहे. एक दिवसआधीच संघांनी दूध संकलन बंद ठेवले.
- सरकारने दुधाच्या भुकटीला अनुदान देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. शहरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने उपाययोजना केली आहे. प्रसंगी पोलीस बंदोबस्तात दुधाचे टँकर आणू - महादेव जानकर, दुग्धविकास मंत्री
- दूध संघाने दोन दिवस आधीच दुधाचा मुंबईला होणारा पुरवठा वाढवून किमान दोन दिवस येथे दूधटंचाई भासणार नाही, याची काळजी घेतली आहे.
-वरूड (अमरावती) : दूध दरवाढीच्या मुद्द्यावर आक्रमक होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दुधाचा टँकर पेटविण्याचा प्रयत्न करून आंदोलन छेडले.