मुंबई- भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथिल घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात काय काय बंद राहाणार आहे जाणून घ्या.
- मुंबईच्या डबेवाल्यांचा या बंदाला पाठिंबा दिला आहे, मुंबई डबेवाला संघटनेनं काम बंद ठेवलं आहे.
- मुंबईतल्या शाळा सुरु आहेत तर काही खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहेत. मुंबईसह राज्यातील शालेय बस न चालविण्याचा निर्णय स्कूल बस असोशिएशनने घेतला आहे.
- मुंबईतील गोंवडी, मानखुर्द, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदीवली पूर्व, मालाड पूर्व, दहिसर पूर्वच्या शाळा बंद आहेत. सुरू असलेल्या शाळांमध्ये ३० ते ४०% विद्यार्थ्यांची हजेरी आहे.
- नाशिक, औरंगाबादमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
- सोशल मीडियावरून अफवा पसरू नये म्हणून औरंगाबादमधील इंटरनेट सेवा 12 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. रात्री १२ ते आज दुपारी १२ पर्यंत शहरात इंटरनेट सेवा बंद असेल सोयगाव शहरात कडकडीत बंद. सर्व दुकाने, बस डेपो तसेच खाजगी वाहतूक बंद.
- औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात उमटल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारच्या सर्व परीक्षा रद्द केल्या.
- वाशिममध्ये सुरक्षेच्या कारणामुळे शाळा, बाजारपेठ, एसी बस सेवा बंद आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील अकरा एसटी आगाराची वाहतूक बंद आहे.
- अहमदनगरमध्ये कांदा मार्केट बंद असून मंगळवारी आलेल्या कांद्याचा गुरुवारी सकाळी होणार लिलाव होणार आहे. आडते-व्यापा-यांच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
- अमरावतीमध्ये सुरक्षेच्या कारणामुळे काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- अकोला जिल्ह्यात एसटी सेवा ३ जानेवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद आहे.
- अकोला जिल्ह्यातील माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत.
- टॅक्सी चालक आणि मालक, रिक्षा चालकांनी बंदला पाठिंबा दिल्याने त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी टॅक्सी, रिक्षा बंद आहेत.