शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

LalBaug Raja Visarjan 2018: 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या 'राजाला भक्तिमय निरोप'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 9:45 AM

LalBaug Raja Visarjan 2018: पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत.

मुंबई - पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीत भक्तिमय वातावरणात निरोप दिला. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी  (23 सप्टेंबर) नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली होती. तर, आज सकाळी 9 वाजता गिरगाव चौपाटी येथे आरती करुन लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसले. 

LIVE UPDATES :

22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भक्तिमय निरोप

लालबागच्या राजाची गणेश भक्तांकडून गिरगाव चौपाटीवर आरती, आरतीनंतर बाप्पा समुद्रात

कोल्हापूर- २२ तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता

पुणे - प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे पहाटे पाच वाजता विसर्जन

मुंबई - लालबागचा राजाचे गिरगाव चौपाटीवर आगमन, दर्शनासाठी मोठी गर्दी

 

 

पुणे - दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विद्युत रोषणाईच्या रथाचे महापौर मुक्ता टिळक यांनी केले सारथ्य.

पुणे - मंडई पाठोपाठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे पथक अलका चौकात दाखल. दोन्ही गणपतींचे यंदा अलका चौकात प्रथमच एक तास आधी आगमन

मुंबई - रात्री 12 वाजेपर्यंत मुंबईत 2254 सार्वजनिक आणि 25 हजार 321 घरगुती गणपतींसह 148 गौरींचे विसर्जन

नाशिक- शहरातील सातपूर विभागातील 9 अधिकृत विसर्जन केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत 37 हजार 521 गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या आहेत

मुंबईः रात्री नऊ वाजेपर्यंत सार्वजनिक १५१० आणि घरगुती २२५६९ गणपती मूर्तींचे विसर्जन.

कोल्हापूर : डोळे दिपविणारा लेसर शो आणि लाईट शो, विविध लोकनृत्यांनी गणपती विसर्जन  मिरवणूक रंगली. गणेशभक्त आणि कोल्हापूरकरांच्या गर्दीने मिरवणूक मार्ग फुलून गेला.

नाशिक- हिंदू जन जागृती संघटनेने विसर्जित मूर्ती दान संघटनेला विरोध केला, प्रवाही पाण्यात मूर्ती विसर्जित करा असे फलक घेऊन चोपडा लॉन्स येथे घेऊन भाविकांना आवाहन केले.

नवी मुंबई - कोपरी गावातील गेली अनेक वर्षांपासून तृतीयपंथी मंडळाच्या गणपती बाप्पाची वाशी विसर्जन तलावाजवळ आरती करताना तृतीयपंथी...

नवी मुंबई - वाशी तलावात गणपती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी...

ठाणे: ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलाव येथे बाप्पांना साश्रु नयनाने निरोप देण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांसाठी ठाणे शहर(जिल्हा) काँग्रेस कमिटी पृरस्कृत व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपण सारे' या संस्थेच्या वतीने लोकनेते स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या स्मरणार्थ  मोफत वडापाव,पाणी तसेच चाॅकलेट्स वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. 

नवी मुंबई : गायक शंकर महादेवन यांच्या घरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाआधी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. 

अमरावती : जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 97 गणपतीचे विसर्जन शांततेत पार पडले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात विसर्जन कार्यक्रम पार पडले.

जळगाव : जलसंपदामंत्री गिरीश महाजन गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी. एका नाराज मंडळाची घातली समजूत.

अहमदनगर: नगर येथील मानाच्या नऊ गणेश मंडळानी प्रवरासंगम ( ता. नेवासा)  केले विसर्जन. मिरवणुकीत सहभाग न घेता केला निषेध

नाशिक- गोदावरी आणि अन्य जलाशय प्रदूषित होऊ नये यासाठी नाशिक महापालिका आणि विविध सेवाभावी संस्थांनी नागरिक आणि गणेश मंडळांकडून शेकडो मूर्तींचे दान स्वीकारून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जनाची परंपरा जपली आहे. 

जळगाव - मेहरुण तलावात बुडून एका गणेश भक्ताचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

खामगाव : शहरात सकाळी 11 वाजता शांततेत  सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी पाच वाजता गालबोट लागले. मस्तान चौकात जय भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह दोन नगरसेवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.

नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत जातीय सलोख्याचे दर्शन घडले.

सोलापूर - सोलापुरात कसबा गणपती मिरवणूक दरम्यान मिरवणूक पुढे घेऊन जाण्याच्या कारणावरून मारुती मंदिराजवळ लेझीम फेकून मारल्याने दोघे जखमी...

कल्याण - दुर्गाडी खाडीवर गणेश विसर्जन

वाशिम जिल्हयात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात !

अहमदनगर : मुख्य मिरवणूकीवर मानाच्या 12 मंडळाचा बहिष्कार; आदिनाथ तरूण मंडळ, नौजवान मित्र मंडळ, दोस्ती तरूण मंडळ, कपालेश्वर मित्र मंडळ, महालक्ष्मी तरूण मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार; थोड्याच वेळात सुरू होणार मिरवणूक...

अहमदनगर : गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोघे पाण्यात वाहून गेले. संगमनेर शहरातील प्रवरा पात्रातील घटना.

जळगाव - नेहरू चौक मित्र मंडळाच्या  गणेश विसर्जनाच्या वाहनात बिघाड, वाहन बाहेर काढण्याचा पोलिसांचा तगादा,  कार्यकर्ते व पोलिसांत वाद.

- नाशिकमध्ये भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

- कोल्हापूर : गणेशोत्सवात कोल्हापूरने एक वेगळी परंपरा जोपासली आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवारी युवती, महिलांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला.

- कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर,  फुगडीचे फेर धरत, लेझीम खेळत उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला. 

- नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाच्या वादकांनी हेल्मेट परिधान करीत हेल्मेट वापराचा संदेश दिला.

- सोलापूर : पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ

- नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीत विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे चित्ररथ  सहभागी

- सोलापूर : सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ

- जळगाव : मेहरुण तलावावर गणेश विसर्जन प्रसंगी पर्यावरण संघटनांतर्फे निर्माल्य संकलन. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद.

- मुंबई : मानाच्या गणपतींच्या विसर्जन मार्गावर गुलाल आणि पुष्पवृष्टी

- मुंबईच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी

- पुणे : गणपती मंडळाचे स्वागत करण्यासाठी अलका टॉकीज चौकात काढली भव्य रांगोळी

- पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ची मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल

- पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : कसबा गणपतीसमोर परदेशी नागरिक मिरवणुकीत सहभागी

- कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन सुरुवात सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी धरला लेझीमवर ठेका

- जळगाव : जळगावच्या मिरवणुकीत डीजेला फाटा. फक्त पारंपरिक वाद्यांचाच वापर.

- जळगाव : मनपाचे आयुक्त चंद्रकांत डांगे मानाच्या गणपतीच्या पुढे मिरवणुकीत सहभागी

- जळगाव : नाशिक येथील पथकाकडून मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर.  जळगावकरांची जिंकली मने.

- नंदुरबार : जिल्हा भरात गणेश विसर्जन मिरवणुकांना सकाळपासून  सुरूवात झाली आहे. दोनशे पेक्षा अधिक सार्वजनिक तर 500 पेक्षा अधिक खासगी मंडळांतर्फे मिरवणुका सुरू आहेत. 

- नाशिकमधील मुख्य विसर्जन मिरवणूक डीजे व गुलाल मुक्त, पारंपारिक वाद्य वादन

- जळगाव : मेहरुण तलावावर गणेश विसर्जनास प्रारंभ 

- नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये बडविला ढोल

- नाशिक : शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला आहे. विविध ढोल ताशा पथक सहभागी झाले आहेत. 

- नागपूर, नंदुरबार, अकोला, वाशिम, राज्यभरात ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

- पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : तुळशीबाग गणपती मंडळापुढे सादर करण्यात येत असलेला मर्दानी खेळ शिवयोद्धा

-  पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती शेषनाग रथात विराजमान झाला आहे.

- जळगाव : शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. शहर पोलीस​स्टेशन समोर पोलीस व होमगार्ड यांना फूड पैकेटचे वाटप सुरू

- पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : मानाचे चार गणपती महात्मा फुले मंडईतून मार्गस्थ

- मुंबई : लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

- खामगाव : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीस सुरुवात. मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाकडी गणपतीचे पूजन करून मिरवणुकीस सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली आहे.

- ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. 

- मुंबई : परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात 

- पुण्यातील रस्त्यांवर भव्य आणि आकर्षक रांगोळ्या, महानगरपालिकेकडून 210 ठिकाणी विसर्जनाची सोय

- मुंबई : 'करीरोडच्या कैवारी'च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात 

- पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडईजवळ दाखल

- जळगाव : मानाच्या गणपतीच्या आरतीसाठी मनपा आवारात तयारी सुरू, महापौर, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक दाखल, पोलिस अधीक्षक, आमदारांची प्रतिक्षा

- कोल्हापूर : मानाच्या गणपती पूजनानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे बॉडिगार्ड आणि पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप

- पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीला सुरुवात

- पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मानाच्या पहिल्या कसबा व मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतींचे मंडई येथून प्रस्थान झाले आहे.

Ganesh Visarjan 2018 : पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

-  मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी महिलांचं कोळी नृत्य

- मुंबई : नृत्य सादर करत कोळी महिलांचा लालबागच्या राजाला निरोप

- मुंबई-पुण्यासह राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

- सोलापूर : सोलापुरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ, शहरातील प्रमुख मंडळाच्या मिरवणूकीला सुरुवात

- कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या गणरायाचे पोलीस वाद्यवृंदाच्या गजरात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

- अहमदनगरचे ग्रामदैवत विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीस सुरुवात

-  पुणे गणपती विसर्जन मिरवणूक : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं महात्मा फुले मंडईत आगमन

Anant Chaturdashi 2018 : गणरायाला आज मुंबईकर देणार निरोप

- लालबागच्या राजाचा मिरवणूक मार्ग रांगोळ्यांनी, फुलांच्या आणि पैशांच्या माळांनी सजला

- हजारो भाविकांचा उत्साह शिगेला 

- 'मुंबईचा राजा' गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

- पुण्यात साडे दहा नंतर विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार

पुढच्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन ११ दिवस लवकर!

- मंबई : गणेश विसर्जनानिमित्त मध्य रेल्वेवर रात्री उशिरापर्यंत सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-कल्याण; पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान विशेष लोकलसेवा सुरू राहणार 

- अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज रेल्वेकडून मेगाब्लॉक रद्द

- गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज, चौपाट्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनLalbaugcha Rajaलालबागचा राजाGanpati Festivalगणेशोत्सव