06 Oct, 21 02:23 PM
नागपूर जिल्हापरिषद पोटनिवडणूक अंतिम निकाल
जागा १६
निकाल प्राप्त १६
काँग्रेस- ९
भाजप-0३
शिवसेना-00
राष्ट्रवादी-२
शेकप - 01
गोंडवाना गणतंत्र पार्टी 01
इतर-00
06 Oct, 21 02:22 PM
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल
०१) केळवद- सुमित्रा कुंभारे- काँग्रेस
०२) वाकोडी- ज्योती सिरसकर- काँग्रेस
०३) राजोला- अरुण हटवार- काँग्रेस
०४) गुमथाळा- दिनेश ढोल- काँग्रेस
०५) वदोडा-अवंतीका लेकुरवाळे- काँग्रेस
०६) आरोली- योगेश देशमुख- काँग्रेस
०७) करंभाड- अर्चना भोयर- काँग्रेस
०८) निलडोह- संजय जगताप- काँग्रेस
०९) गोधणी (रेल्वे)- कुंदा राऊत- काँग्रेस
१०) येनवा- समीर उमप- शेकाप
११) डिगडोह-रश्मी कोटगुले- राष्ट्रवादी
१२) भिष्णुर- प्रवीण जोध राष्ट्रवादी
१३) बोथीय पालोर- हरिष उईके- गोंडवाना
१४) पारडशिंगा- मीनाक्षी सरोदे- भाजप
१५) सावरगाव - पर्वता काळबांडे- भाजप
१६) डिगडोह-इससानी- मतमोजणी सुरू आहे
06 Oct, 21 01:50 PM
पालघरमध्ये भाजप-मनसे युतीचा प्रयोग फसला
पालघरच्या सापणे पंचायत समिती निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराचा पराभव, भाजपशी केलेली अप्रयत्यक्ष युती ठरली फोल; शिवसेनेच्या उमेदवाराचा दणदणीत विजय
06 Oct, 21 12:43 PM
वाशिम जिल्हा परिषदेचे सर्व निकाल हाती, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी
एकूण जागा १४
निकाल जाहिर १४
(विजयी उमेदवार/पक्ष)
१)आसेगाव सर्कल : चंद्रकांत ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस ) पुन्हा विजयी
२) कंझरा सर्कल - सुनिता कोठाळे (राष्ट्रवादी काँग्रेस) पुन्हा विजयी
३) दाभा सर्कल - राजेश राठोड ( राष्ट्रवादी काँग्रेस)
४) काटा सर्कल - संध्याताई विरेंद्र देशमुख (काँग्रेस)
५) पार्डी टकमोर - सरस्वती चौधरी (अपक्ष) पुन्हा विजयी
६) उकळीपेन - सुरेश मापारी (सेना)
७) कवठा सर्कल - वैभव सरनाईक (काँग्रेस)
८) गोभणी - पूजा भुतेकर, (जनविकास) पुन्हा विजयी
९) भर जहागीर - अमित खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस)
१०) कुपटा - उमेश ठाकरे (भाजपा) पुन्हा विजयी
११) तळप बु. सर्कल - शोभा गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) पुन्हा विजयी
१२) फुलउमरी - सुरेखा चव्हाण, (भाजपा) पुन्हा विजयी
१३) पांगरी नवघरे सर्कल - लक्ष्मी लहाने ( वंचित आघाडी) पुन्हा विजयी
१४) भामदेवी सर्कल : वैशाली प्रमोद लळे (वंचित आघाडी) पुन्हा विजयी
.........
पक्षीय बलाबल
पक्ष आता २०२० मध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस ०५ ०३
कॉंग्रेस ०२ ०१
सेना ०१ ०१
भाजपा ०२ ०२
वंचित ०२ ०४
जनविकास ०१ ०२
अपक्ष. ०१ ०१
..........
परिवर्तन झालेले जि.प. गट
१ ) भर जहागीर
२ ) कवठा
३) काटा
४ ) दाभा
५ ) उकळीपेन
06 Oct, 21 01:13 PM
सावनेर तालुक्यातील केळवद जिल्हा परिषद सर्कल मध्ये १२५० मतांनी कॉंग्रेस सौ सुमित्रा मनोहर कुंभारे विजयी; मंत्री सुनील केदार यांनी त्यांचा गड शाबूत राखला, 1338 मतांनी सौ सुमित्रा कुंभारे विजयी
06 Oct, 21 12:56 PM
नागपूर तालुका गोधनी रेल्वे जि.प. सर्कल
कुंदा राऊत (काँग्रेस) विजयी
कुंदा श्यामदेव राऊत (काँग्रेस) - ९८६५
विजय पुरुषोत्तम राऊत (भाजप) - ६०६२
भोजराज तुकाराम सरोदे (वंचित) - ५७७
नोटा - २४४
06 Oct, 21 12:55 PM
तालुका : पारशिवणी, काँग्रेस उमेदवाराचा विजय
जि.प.सर्कलचे नाव :करंभाड
1) अर्चना दीपक भोयर- विजयी ( काँग्रेस) 6793
2) संजीवनी राजेश गोमकाळे (शिवसेना) 4761
३) प्रभा राजेश कडू ( भाजप) 3058
४)किरण वाहने ( वंचित आघाडी) 730
नोटा - 140
लीड: 2032
06 Oct, 21 12:43 PM
पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांचा पराभव, भाजपाच्या पंकज कोरे यांनी विजय मिळवला आहे.
06 Oct, 21 12:41 PM
नंदूरबारमध्ये भाजपला धक्का, 4 जागा गमावल्या
नंदूरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागांवरील सदस्यांच्य सदस्यत्व रद्द झालं होतं. त्यामध्ये भाजपच्या 7 सदस्यांना फटका बसला होता. पोटनिवडणुकीत भाजपनं 4 जागा गमावल्या आहेत. आता त्यांच्या 3 जागा निवडून आल्या आहेत.
06 Oct, 21 12:37 PM
नागपूर तालुका गोधनी रेल्वे जि.प. सर्कल
कुंदा राऊत (काँग्रेस) विजयी
कुंदा श्यामदेव राऊत (काँग्रेस) - ९८६५
विजय पुरुषोत्तम राऊत (भाजप) - ६०६२
भोजराज तुकाराम सरोदे (वंचित) - ५७७
नोटा - २४४
06 Oct, 21 12:37 PM
अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता
अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
11) दानापुर: गजानन काकड: काँग्रेस
12) तळेगाव: संगीता आढाऊ: वंचित
13) कानशिवनी: किरण अवताडे; राष्ट्रवादी
14) कुटासा: निखिल गावंडे: प्रहार
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस: 01
प्रहार: 01
06 Oct, 21 12:30 PM
काटोल तालुका: येनवा जिल्हा परिषद सर्कल
जि.प.सर्कलचे नाव : येनवा
१) समिर शंकरराव उमप- शेकाप - 8760 (2851 मतांनी विजयी)
2) निलेशकुमार राजेंद्र धोटे - भाजप -5909
3) सिद्धार्थ रामदास कुकडे - वंचित -863
4) अखिल प्रफुल चोरघडे - शिवसेना -258
06 Oct, 21 12:24 PM
राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना मोठा धक्का
अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघातून प्रहारचे उमेदवार स्फूर्ती निखिल गावंडे विजयी. बच्चू कडूंच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एन्ट्री. आमदार अमोल मिटकरींचा गावातच पराभव.
06 Oct, 21 12:07 PM
धामणी मानोरा गणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोविंदराव म्हातारमारे ७ मतांनी विजयी
06 Oct, 21 12:05 PM
काटोलमध्ये अनिल देशमुखांना मोठा धक्का
काटोल विधानसभा मतदार संघातील सावरगाव व पारडसिंगा या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने गमावल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या.
सावरगाव मध्ये भाजपच्या पार्वती काळबांडे या 334 मतांनी विजयी झाल्या. तर पारडसिंगा येथे भाजपच्या मीनाक्षी संदीप सरोदे यांनी बाजी मारली.
06 Oct, 21 12:01 PM
वाशिम जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे पिछाडीवर, राष्ट्रवादीला धक्का
राष्ट्रवादी चंद्रकांत ठाकरे- 2659 (468 मतांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पिछाडीवर)
वंचित सुभाष राठोड 3127
आसेगाव सर्कल 12 वा राऊंड
06 Oct, 21 11:54 AM
कामठी तालुका निकाल
कामठी तालुक्यातील गुमथाला जिल्हा परिषदच्या सर्कल पोटनिवडणुकीत उमेदवारांना मिळालेली खालीलप्रमाणे
दिनेश ढोले (काँग्रेस) 10474 ,
अनिल निधान (भाजप ) 6879 ,
विष्णू पानतावणे 159
नोटा 156
एकुण मतदार 17 हजार 668
या निवडणुकीत काँग्रेसचे दिनेश ढोले यांनी जिल्हा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता अनिल निधान यांचा 3595 मतांनी पराभव केला
06 Oct, 21 11:53 AM
अकोटः जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक निकाल..
अकोलखेड जि.प.मधून शिवसेनेचे जगन निचळ विजयी..!
अकोलखेड पंचायत समितीमधून शिवसेनेचे ईश्वरचिठ्ठीने सुरज गणभोज विजयी, शिवसेना आणि काँग्रेस उमेदवाराला पडली समसमान मतं; चार वर्षांच्या मुलीच्या हातून उडवण्यात आली ईश्वरचिठ्ठी
06 Oct, 21 11:46 AM
वाशिम तालुका: उकळी पेन जि.प. सर्कलमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी विजयी.
06 Oct, 21 11:44 AM
नंदुरबारमध्ये शिवसेनेला जागा मिळाली
माजी आमदार व शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी कोपरली गटातून 3 हजार मतांनी विजयी.
06 Oct, 21 11:42 AM
कामठी तालुका
वडोदा जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे दुसऱ्या फेरीअखेर 1857 मताने आघाडीवर.
06 Oct, 21 11:42 AM
रिसोड तालुक्यात राष्ट्रवादीचे अमित खडसे विजयी
रिसोड तालुक्यातील भर जहांगीर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित खडसे विजयी .
06 Oct, 21 11:41 AM
नरखेड तालुका
सावरगाव जि.प. सर्कल राष्ट्रवादीच्या बंडखोर अंजली सतीश शिंदे आघाडीवर. अंजली माजी आमदार सुनील शिंदे यांच्या सून आहे. नरखेड, काटोल मध्ये राष्ट्रवादीला फटका बसताना दिसतो आहे.
06 Oct, 21 11:40 AM
शिर्ला मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे सुरेश फाटकर विजयी, देगाव मतदार संघात वंचित बहुजन आघाडी च्या राम गव्हाणकर विजयी, जि.प.दगडपारवा मतदार संघ राष्ट्रवादीच्या सुमनताई गावंडे विजयी
06 Oct, 21 11:33 AM
मूर्तिजापूर ब्रेकिंग
लाखपूरी जिल्हा परिषद
सम्राट जयराम डोंगरदिवे (अपक्ष)
३९९० मते घेऊन ६२६ मतांनी विजयी
06 Oct, 21 11:30 AM
मौदा तालुक्यात काँग्रेस उमेदवाराचा विजय
अरोली कोदामेंढी जि. प. सर्कल मध्ये काँग्रेसचे योगेश देशमुख १६७३ मतांनी विजयी. भाजपचे सदानंद निमकर पराभूत.
06 Oct, 21 11:29 AM
नंदुरबारमध्ये के.सी.पाडवींच्या बहिणीचा विजय
आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी खापर गटातून विजयी
06 Oct, 21 11:28 AM
पालघर:- सावरे एम्बुर गटात शिवसेनेच्या विनया विकास पाटील 3635 मताने विजयी
06 Oct, 21 11:28 AM
कारंजा तालुक्यातील भामदेवी गटात वंचित बहुजन आघाडीचे लळे विजयी
06 Oct, 21 11:27 AM
नागपूर : कामठी तालुक्यातील वडोदा सर्कल येथील काँग्रेसच्या उमेदवार अवंतिका लेकुरवाळे पहिल्या फेरीत सुमारे दिड हजार मतांनी आघाडीवर आहेत
06 Oct, 21 11:27 AM
धुळ्यात साक्री तालुक्यातील म्हसदी पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या अर्चना राजधर देसले विजयी.
06 Oct, 21 11:26 AM
गोभणी गटात जनविकास आघाडीच्या पूजा भूतेकर विजयी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांच्या होमग्राऊंडमध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव !
06 Oct, 21 11:26 AM
काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना धक्का बसण्याची शक्यता
काटोलच्या पारडसिंगा सर्कल भाजपाच्या मीनाक्षी सरोदे 906 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादीच्या शारदा कोल्हे मागे.
06 Oct, 21 11:24 AM
नागपूर : कामठी तालुक्यातील वडोदा सर्कल येथील काँग्रेसच्या उमेदवार अवंतिका लेकुरवाळे पहिल्या फेरीत सुमारे दिड हजार मतांनी आघाडीवर आहेत
06 Oct, 21 11:23 AM
पालघर जिल्हा परिषदेत चुरशीची लढत
पालघर जिल्हापरिषदेच्या सावरे ऐम्बुर गटातून शिवसेनेच्या विनया विकास पाटील ३६३५ मतानी विजयी, मोखाडा आसे गटातून राष्ट्रवादीचे हबीब शेख १६१६ मतांनी विजय. बोर्डी गटातून भाजपच्या ज्योती प्रशांत पाटील ४१६ मतांनी विजयी, नंडोरे - देवखोप जीप गटातून शिवसेनेच्या निता समीर पाटील ८०० मतांनी विजयी
06 Oct, 21 11:18 AM
शिरपूर तालुक्यात भाजपाचं वर्चस्व
शिरपूरमध्ये भाजपाचं कमळ फुललं, सर्व आठही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी
यापूर्वी भाजपचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. आता सहा उमेदवार विजयी झाले. म्हणजे आठही गणांवर भाजपचे वर्चस्व.
06 Oct, 21 11:16 AM
नागपूर पंचायत समिती: दवलामेटी गण
अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या सुलोचना ढोके १० मतांनी विजयी, भाजपाच्या ममता जैस्वाल यांचा पराभव
सुलोचना ढोक काँग्रेस - 2161
ममता जैस्वाल भाजप - 2151
मंगला कांबळे वंचीत - 2064
अलका पाटील - 151
नोटा - 91
10 मतांनी सुलोचना ढोक विजयी
06 Oct, 21 11:14 AM
सावनेर तालुक्यात काँग्रेस उमेदवार आघाडीवर
वाकोडी जिल्हा परिषद सर्कल मधील काँग्रेसच्या विद्यमान सदस्य ज्योती शिरस्कर या पहिल्या फेरीत पाचशेहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत
06 Oct, 21 11:13 AM
नागपूर : कळमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे उमेदवार श्रावण भिंगारे पहिल्या फेरीत एक हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर
06 Oct, 21 11:01 AM
धुळ्यात गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या कन्येचा मोठा विजय
धुळ्यात लामकानी गटातून गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी, देवरे यांना ८६९०, तर शिवसेनेच्या मीनाबाई पाटीलयांना ४४९४ मतं
06 Oct, 21 10:58 AM
नंदुरबारमध्ये भाजपाच्या सुप्रिया गावित यांचा विजय
नंदुरबारमध्ये भाजपा आमदार विजयकुमार गावित यांच्या कन्या आणि खासदार हिना गावित यांच्या बहिण सुप्रिया गावित यांचा विजय
06 Oct, 21 10:53 AM
कामठी तालुका
गुमथळा जिल्हा परिषद सर्कल मधील काँग्रेसचे दिनेश ढोले दुसऱ्या फेरी अखेर 2400 मतांची आघाडीवर
06 Oct, 21 10:51 AM
पालघरमध्ये बोर्डी गटात भाजप उमेदवार विजय
पालघरमध्ये बोर्डी गटात भाजपाच्या ज्योती पाटील यांचा ४०० मतांनी विजय
06 Oct, 21 10:44 AM
नागपूरमध्ये भाजपला आणखी एक जागा
नरखेड बेलोना पंचायत समिती भाजपच्या हेमलता सातपुते विजयी.
06 Oct, 21 10:42 AM
धुळ्यातून मोठी घडामोड
गुजरात राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या कन्या धरती देवरे लामकानी गटात भाजपातर्फे दुसऱ्या फेरी अखेर आघाडीवर आहे
06 Oct, 21 10:39 AM
मौदा तालुका
अरोली जिल्हा परिषदेत योगेश देशमुख (काँग्रेस) पहिल्या फेरीत ८०० मतांनी आघाडीवर. भाजपचे नेते सदानंद निमकर पिछाडीवर
06 Oct, 21 10:38 AM
अकोला पंचायत समितीत शिवसेनेनं खातं उघडलं
दहीहंडा पंचायत समितीत सेनेचे गजानन वानखडे विजयी
06 Oct, 21 10:35 AM
नागपुरात मतमोजणी केंद्रावर गर्दी
नागपूर जिल्ह्यातील कुही येथील मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
06 Oct, 21 10:33 AM
नागपुरातून पहिला निकाल भाजपाच्या बाजूनं
नागपूर पंचायत समीतीच्या दवलामेटी गणात भाजपच्या ममता जयस्वाल विजयी, जयस्वाल यांना 1203 मते पडली.
06 Oct, 21 10:31 AM
अकोला: मूर्तिजापूर तालुक्यात लाखपुरी गटातील अपक्ष उमेदवार दीड हजार मतांनी पुढे
जिल्ह्यात मंगळवारी 14 जिल्हा परिषद गट व 28 पंचायत समिती गणांमध्ये पोट निवडणूक पार पडली या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत सकाळी दहा वाजता पासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, तालुक्यातील अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे हे दीड हजार मतांनी पुढे आहेत.
06 Oct, 21 10:30 AM
अकोल्यात मतमोजणीला सुरुवात
अकोल्यातील हिवरखेड पंचायत समितीत गण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आघाडीवर
06 Oct, 21 10:28 AM
धुळ्यात मतमोजणीला सुरुवात
धुळ्यात पंचायत समितीच्या ३० आणि जिल्हा परिषदेच्या १५ जागांवर निवडणूक झाली आहे. मत मोजणीला कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात
06 Oct, 21 10:25 AM
नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस उमेदवार आघाडीवर
नागपूर जिल्हा परिषदेतील भाजपचे विरोधी पक्षनेते अनील निदान हे पहिल्या फेरीत सुमारे दिड हजार मतांनी मागे आहेत. काँग्रेसचे ढोले आघाडीवर
06 Oct, 21 10:05 AM
आज कोणत्या पंचायत समितीच्या किती जागांचा निकाल?
धुळे- ३०
नंदूरबाद- १४
अकोला- २८
वाशिम- २७
नागपूर- ३१
पालघर- १४
06 Oct, 21 10:04 AM
आज कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांचा निकाल?
धुळे- १५
नंदूरबार- ११
अकोला- १४
वाशिम- १४
नागपूर- १६
पालघर- १५