मुंबई : अभिनेता विकी कौशल यांना लोकमततर्फे पाथ ब्रेकर अवॉर्ड देण्यात आला. महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा आज लोकमत समूहाच्या वतीने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला हा नेत्रदिपक वरळी येथील एनएससीआय डोममध्ये रंगला असून या सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे.विकी कौशल यांनी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २०१५ मध्ये त्यांना आयफा आणि स्क्रीन अवॉर्डने सन्मानित केले होते. २००१८ मध्ये त्यांनी संजू आणि राझी मध्येही सहकलाकाराची भूमिका केली होती. २०१९ मध्ये आलेला उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटामध्ये त्यांनी नायकाची भुमिका उत्तम वठविली आहे.
हे होतं परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.