शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

LMOTY 2022: शरद पवार यांच्यानंतर फडणवीसच..! एकनाथ शिंदेंसमोर असे का म्हणाले नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 7:39 AM

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: एकनाथ शिंदेंनी खूप वर्षांपासून ओळखतो. ज्यावेळी ते आमदार होते, मीसुद्धा आमदार होतो. विरोधी पक्षात आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. पुन्हा सरकारमध्ये आलो त्यावेळी मंत्री म्हणून काम केलं... असे उत्तर देणे सुरू केले

लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना किती वर्षांपासून ओळखता?’ असा सवाल केला. त्यावर शिंदे यांनी, खूप वर्षांपासून ओळखतो. ज्यावेळी ते आमदार होते, मीसुद्धा आमदार होतो. विरोधी पक्षात आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. पुन्हा सरकारमध्ये आलो त्यावेळी मंत्री म्हणून काम केलं... असे उत्तर देणे सुरू केले, तेव्हा हळूच विजय दर्डा म्हणाले, ‘हा प्रश्न यासाठी विचारला की, देवेंद्र फडणवीस यांना ओळखताच येत नाही. त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय हवंय, हे त्यांचा चेहरा पाहूनही लक्षात येत नाही. त्याबरोबर नाना पाटेकर विजय दर्डा यांच्याकडे पाहून म्हणाले, असं शरदरावांबद्दल बोलायचे पूर्वी लोक... आणि सभागृहात हंशा पिकला. 

मुंबईच्या फिल्मसिटीबद्दल फडणवीस म्हणाले...विजय दर्डा : तुम्ही मुख्यमंत्री असताना सांगितले होते, की दिवसेंदिवस बॉलीवूड हे तांत्रिक अंगाने हॉलीवूडपेक्षा सशक्त होत आहे. पण मुंबईचे वर्चस्व कमी होत आहे. वेगवेगळ्या राज्यांतील लोक चित्रीकरणाची मागणी करीत आहे. त्यांना सूट दिली जात आहे. सुविधा दिल्या जात आहे. मुंबईमध्ये हॉलीवूडपेक्षाही आपले बॉलीवूड सक्षम कसे होईल? 

फडणवीस : विद्यापीठे अनेक झाली. पण ऑक्सफर्ड आणि केंब्रिज तशाच आहेत. त्यांना कोणीही संपवू शकले नाही. मुुंबई ही नॅचरल इको सिस्टीम आहे. मुंबईत नॅचरल टॅलेंट आहे. काहीवेळेसाठी तुम्ही एक वातावरण तयार करू शकता, की कधी दक्षिणेत तर कधी उत्तर राज्यात. पण मुंबईला कोणी प्रतिस्पर्धी नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर एक सिंगल विंडो तयार केली आहे. कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. सरकार बदलल्यानंतर ही योजना बंद झाली. ही योजना पुन्हा सुरू करणार आहोत. इथे फिल्म इंडस्ट्रीजची एक इको सिस्टीम आहे. तशाच पध्दतीने व्यावसायिक दृष्टिकोन आणावा लागेल. चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी आम्हाला पोलीस ठाण्यांची परवानगी घेणे, चित्रीकरणाच्या ठिकाणी काही गुंड लोकांना त्रास देणार असतील तर त्या स्थितीत फायदा होणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही काम करीत आहोत. आमच्या फिल्मसिटीमध्ये जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा आमचा मानस आहे.  

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022Nana Patekarनाना पाटेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे