शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लोडशेडिंगमुळे राज्यात कोट्यवधींचा फटका, मराठवाड्यात नऊ तास वीज गायब, उत्पादन झाले ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 5:48 AM

कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. रविवारपासून ५ ते ९ तासांपर्यंत भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. परिणामी उद्योग बंद ठेवायची पाळी उद्योजकांवर आली असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतीपंपही बंद झाले आहेत.

मुंबई : कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. रविवारपासून ५ ते ९ तासांपर्यंत भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. परिणामी उद्योग बंद ठेवायची पाळी उद्योजकांवर आली असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतीपंपही बंद झाले आहेत.मराठवाड्यात तब्बल नऊ तास वीज गायब झाल्याने औरंगाबादमधील प्रमुख एमआयडीसींसह सर्वच उद्योगांमधील उत्पादन बंद झाले आहे. राज्याला सध्या १५ हजार मेगावॅट विजेची गरज आहे. पण १४ हजार १०० मेगावॅट वीजनिर्मिती होत असून ९०० मेगावॅटचा तुटवडा असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मात्र वस्तुस्थिती वेगळी असून दीड हजार मेगावॅटहून अधिक तुटवडा भासत आहे.सोमवारपासून मराठवाड्यातील वीजनिर्मिती कंपन्यांकडून महावितरणला विजेचा पुरवठा कमी झाल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले. विदर्भात नागपूर, यवतमाळ, गोंदिया, अमरावती व अकोला जिल्ह्यांमध्ये मोठे लोडशेडिंग सुरू आहे.पुणे जिल्हा व उद्योगनगरी पिंपरी चिंचवडलाही फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४० टक्के भागात भारनियमन सुरू आहे. सांगली जिल्ह्यात सरासरी दोन तास, सातारा जिल्ह्यात वसुली रखडलेल्या गावांना व सिंधुदुर्गलाही भारनियमनाचे चटके बसले आहेत. नाशिक व खान्देशातही अशीच स्थिती आहे.शेतीचे पाणीही झाले बंदजून, जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर आॅगस्टमध्ये चांगला पाऊस झाला. जलाशये भरली, मात्र आता विजेअभावी शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे.सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर ‘हीट’सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यातच आॅक्टोबर हीट जाणवत आहे. विजेअभावी मात्र हा उकाडा असह्य झाला आहे. ग्रामीण भागांत नऊ तर शहरी भागांत सहा तासांपर्यंत भारनियमन सुरू आहे.कोयनेतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीकोयना धरणाच्या टप्पा एक, दोन, तीन, चारमधून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी दिली.15328 मेगावॅट विजेची गरज14812 मेगावॅट वीज उपलब्ध516 मेगावॅट विजेची तूटअसे आहे लोडशेडिंगविभाग तासमराठवाडा : ९विदर्भ : ४ ते ८प. महाराष्ट्र : ३ ते ५उत्तर महाराष्ट्र : ३ ते ५कोकण : ४ ते ५ 

 

टॅग्स :Governmentसरकार