शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
3
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
4
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
5
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
6
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
7
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
8
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
9
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
10
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
11
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
12
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
13
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
14
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
15
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
16
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
17
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
18
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
19
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच
20
Salman Khan : सलमान खानला ६ वर्षांत १२ पेक्षा जास्त वेळा जीवे मारण्याच्या धमक्या; कोणी केलेला फोन?

दौंड पंचायत समितीसाठी लॉबिंग

By admin | Published: February 27, 2017 1:09 AM

दौंड पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे.

केडगाव : दौंड पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे. माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाला १२ पैकी ११ जागा मिळाल्या असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सभापतिपद अडीच वर्षांसाठी इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी केडगावचे झुंबर गायकवाड, बोरीपार्धीच्या मीना धायगुडे व मलठणच्या ताराबाई देवकाते थोरात गटाकडून दावेदार समजल्या जातात.यामध्ये आमदार थोरात गटाकडून प्रत्येकी सव्वा वर्षासाठी माळी व धनगर समाजाला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. खरी दावेदारी माळी समाजाचे झुंबर गायकवाड व धनगर समाजाच्या मीना धायगुडे यांच्यात असल्याचे चित्र आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रतिकूल परिस्थितीत नेत्रदीपक यश मिळवले आहे. यामध्ये प्रथम संधी कुणाला मिळते? याकडे केडगाव व बोरीपार्धी परिसराचे लक्ष लागले आहे. उपसभापतिपदासाठी भांडगावचे नितीन दोरगे, पारगावचे सयाजी ताकवणे, खडकीचे प्रकाश नवले व सहजपुरचे सुशांत दरेकर ही नावे चर्चेत आहेत. यामध्ये निसटता विजय मिळवणारे सयाजी ताकवणे यांना गेली ३५ वर्षे सहकार व राजकारण याचा दांडगा अनुभव आहे. दौंड तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन दोरगे हे माजी सभापती मधुकर दोरगे यांचे पुतणे आहेत. पंचायत समितीमध्ये मिळालेली सर्वाधिक मते त्यांची दावेदारी बळकट करतात.सभापतिपद पूर्व भागास दिल्यास पश्चिम भागातील आश्वासक चेहरा म्हणून ऐनवेळी प्रकाश नवले यांचे नाव पुढे येऊ शकते. नवले यांनी कुलसमर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर यांचा पराभव केला आहे. एकूणच सभापती व उपसभापती पदांसाठी इच्छुकांच्या नावाबद्दल दौंड तालुक्यात कार्यकर्त्यांची चर्चा रंगली आहे. (वार्ताहर)> जिल्हा परिषद सभापतिपदासाठी जगदाळे, शेळके चर्चेतदौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ६ पैकी ५ जागा जिंकून घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे तालुक्याला १ जिल्हा परिषदेचे पद मिळणार हे निश्चित आहे. अध्यक्षपद इतर मागास संवर्गासाठी राखीव आहे. दौंडमधून इतर मागास संवर्गातून एकही उमेदवार नाही. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी गटनेते वीरधवल जगदाळे यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद किंवा सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापतिपद खुणावत आहे, तर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या केडगावच्या राणी शेळके यांच्या समर्थकांची महिला बालकल्याण सभापतिपदाची मागणी या परिसरात जोर धरत आहे.