शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
2
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
3
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
4
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
5
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
6
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
8
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
9
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
10
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
11
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
12
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
13
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
14
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
15
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
16
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
17
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
18
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
19
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
20
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

लोकल घसरली, 'परे' विस्कळीत

By admin | Published: September 16, 2015 3:51 AM

हार्बर मार्गावरील सीएसटी स्थानकाजवळ लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पश्चिम रेल्वेवर जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरले

मुंबई : हार्बर मार्गावरील सीएसटी स्थानकाजवळ लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पश्चिम रेल्वेवर जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरले आणि प्रवाशांना पुन्हा मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. अंधेरी ते विलेपार्लेदरम्यान सकाळी ११च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कामावर जाणाऱ्यांना फटका बसला. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले. तर १३0पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. विरारहून चर्चगेटला निघालेल्या लोकलचे डबे मोठा आवाज होत रुळांवरून घसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या टाकल्या. घसरलेल्या सात डब्यांपैकी दोन डबे तर डाऊनला (विरार दिशेने) जाणाऱ्या जलद मार्गावर कलले. यामुळे जलद आणि धीम्या मार्गावरून चर्चगेटकडे जाणाऱ्या तसेच विरारच्या दिशेनेही जाणाऱ्या जलद लोकल आणि अंधेरी ते वडाळा हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांवर मोठा परिणाम झाला. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पाचव्या मार्गावरही परिणाम झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना अंधेरी तसेच बोरीवलीपर्यंत थांबा देण्यात येत होता. न होणारी उद्घोषणा आणि बंद असलेले इंडिकेटर्स यामुळे प्रवाशांना लोकल न धावण्यामागचे कारण समजू शकत नव्हते. अनेक स्थानकांवर तर प्रचंड गर्दी झाली. घटना घडल्यानंतर तब्बल अर्धा ते पाऊण तासाने पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर आणि लोकल गाड्यांमध्ये घटनेची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच अखेर प्रवाशांनी बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडत कार्यालय गाठले. डहाणू, विरारहून अंधेरीपर्यंत येणाऱ्या ट्रेन या पुन्हा डाऊनच्या दिशेने पाठवण्यात येत असल्याने तासन्तास ताटकळत राहिलेल्या अनेकांनी घरी जाण्याचाच मार्ग पत्करला.रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून लोकलचे ७ डबे रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अप जलद मार्ग सोडता अन्य मार्गावरील लोकल सेवा रात्री ९पर्यंत सुरळीत करण्यात आली. पूर्ववत होण्यास १९ तास...मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास लोकलचे डबे रुळावरून घसरले. त्यानंतर हे डबे रुळावर आणण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली; तर चर्चगेटकडे येणारी जलद लोकल सेवा पहाटे ६ वाजेपर्यंत म्हणजेच १९ तासांनंतर पूर्ववत होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रवासी जखमी... सुधीर स्वामीनाथन (३०), अजय मौर्य (२५), अर्चना सिंग (३0), सोनू प्रजापती (२४), अमलेश यादव (२५), संजय सिंग (२६) हे सहा प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींच्या डोक्याला तर काहींच्या हात व पाठीला दुखापत झाली. जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली.165 जादा बसेस बेस्टकडून सोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे काहींनी स्थानकाबाहेर असणाऱ्या रिक्षा, टॅक्सींचा पर्याय निवडत आपले कार्यालय गाठले. खाजगी बस वाहतूकदारांनीही आयती संधी साधत कमाई केली.

ट्रॅकवर वस्तू आल्याने लोकलला अडथळा झाल्याची शक्यता आहे. अपघाताची चौकशी केली जाईल.- शैलेंद्र कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक