शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

लोकल, मेट्रो ठप्प; रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 5:34 AM

मुंबई मेट्रोला ही महाराष्ट्र बंद आंदोलनाची झळ बसली. घाटकोपर, अंधेरी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास घाटकोपर मेट्रोकडे मोर्चा वळवल्याने प्रथमच मुंबई मेट्रो बंद ठेवावी लागली.

मुंबई - मुंबई मेट्रोला ही महाराष्ट्र बंद आंदोलनाची झळ बसली. घाटकोपर, अंधेरी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास घाटकोपर मेट्रोकडे मोर्चा वळवल्याने प्रथमच मुंबई मेट्रो बंद ठेवावी लागली.आंदोलकांनी घाटकोपर येथील मेट्रो रुळावर सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उड्या घेत मेट्रो रोखून धरली. त्यावेळी तरुण आंदोलकांचा सहभाग लक्षणीय होता. यामुळे घाटकोपर ते एअरपोर्ट रोड मेट्रो फेरी बंद होती. दुपारच्या सत्रात एअरपोर्ट रोड ते वर्सोवा येथील वाहतूक सेवेवरही परिणाम झाला. सकाळपासून बंद असलेली मेट्रो सेवा सायंकाळी ५ वाजता पूर्ववत झाली. बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले होते. त्यामुळे रस्त्यांवर शुुकशुकाट होता. मात्र, तरीही आंदोलनातील काही हुल्लडबाजांनी रस्त्यावर दिसेल ते वाहन अडविण्यास सुरुवात केली. दादर रेल्वे जंक्शनवर आंदोलकांनी ठिय्या देत, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक दुपारी रोखून धरली. त्यामुळे सकाळपासून सुरळीत असलेली लोकल सेवा दुपारनंतर पुरती कोलमडली.सर्वच सार्वजनिक सेवा बंद करण्यासाठी आंदोलक रस्त्यांवर उतरले होते. दादर, गोवंडी, दहिसर, गोरेगाव, घाटकोपर, कांजूर मार्ग, विक्रोळी, चुनाभट्टी रेल्वे स्थानकांवर ठिय्या देत आंदोलकांनी रेल्वेसेवा विस्कळीत केली. गोवंडीला आंदोलकांनी अडीच तास ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखून धरला होता, तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही ‘रास्ता रोको’मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पोलिसांना मारहाणचेंबूर येथे आंदोलकांकडून झालेल्या मारहाणीत दोन पोलीस किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली तर गोवंडीतील आदर्शनगरमध्ये दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत बेस्ट बसचे प्रचंड नुकसान झाले.बेस्टच्या ५२ बसगाड्या फोडल्या‘महाराष्ट्र बंद’ असतानाही बुधवारी बेस्टने एकूण ३ हजार ३७० पैकी ३ हजार २०८ बसेस रस्त्यावर उतरविल्या होत्या. त्यातील ५२ बसेसची तोडफोड झाली. या हल्ल्यांमध्ये चार बेस्ट चालक जखमी झाले आहेत.पश्चिम उपनगरात मारहाण, जाळपोळदहिसरमध्ये आंदोलकांनी २ पेट्रोलपंपांवर तोडफोड केली. हिंदुस्थान नाक्यावर आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून टाकला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonभीमा-कोरेगाव