ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - मुंबईची लाईफलाइन समजल्या जाणा-या लोकल सेवेवर पावसामुळे परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक तब्बल 40 मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक जवळपास 15 मिनिटे उशिरानं सुरू आहे.
रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस मध्य रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे चाकमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तर कुर्ला रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाडही झाला आहे. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल स्थानकात अडकून पडल्या आहेत. सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे मंगळवारी (27 जून ) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकात अचानक तांत्रिक बिघाड झाला असून रेल्वे वाहतूक खोळंबली. ऐन गर्दी आणि कार्यालय गाठण्याच्या वेळेत रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने चाकरमानी हैराण झालेत
मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मुंबईतील जेव्हीएल परिसरात पावसाचे पाणी साचलं आहे. तर ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे.
Mumbai: Waterlogging in Sion and Dadar due to heavy rain (earlier visuals) pic.twitter.com/CHeW1ExNKX— ANI (@ANI_news) June 27, 2017