शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

लोकल वाहतुकीची घसरगुंडी

By admin | Published: July 01, 2017 2:53 AM

निजामुद्दिन-एर्नाकुलम या कोकण रेल्वेमार्गाने जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या इंजीनचे पुढील एक चाक रुळावरून घसरल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : निजामुद्दिन-एर्नाकुलम या कोकण रेल्वेमार्गाने जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या इंजीनचे पुढील एक चाक रुळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.१८ वाजता कल्याण स्थानकात घडली. ही गाडी कसारा मार्गावरून कल्याण स्थानकात येण्यासाठी ट्रॅक बदलत असताना ही घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कर्जतकडे जाणारी डाउन मार्गावरील पूर्ण वाहतूक, तर कसारा-मुंबईदरम्यानची लोकल वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा फटका उपनगरी व लांब पल्ल्यांच्या वाहतुकीला बसला.मंगला एक्स्प्रेसच्या इंजीनचे चाक घसरल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वेची अ‍ॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन तातडीने घटनास्थळी पोहोचली. बचाव पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने चाक रुळावर आणण्याचे काम हाती घेतले. या अपघातामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली होती. कर्जत-कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल दिवा, कोपर, डोंबिवली आणि कल्याण स्थानकात खोळंबल्या होत्या. शेकडो प्रवाशांनी रुळांतून उतरून मार्ग काढणे पसंत केले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मध्येच पावसाच्या दोन सरी आल्याने त्याचा फटका प्रवाशांबरोबर इंजीनची दुरुस्ती करणाऱ्या पथकालाही बसला. रूळ व ओव्हरहेड वायरचे फारसे नुकसान झाले नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. प्रवाशांसाठी मोफत चहा-मंगला एक्स्प्रेसमधील प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने मोफत चहा, बिस्कीट, पाणी आणि वडापाव देण्यात आले, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला.१प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेने टिटवाळा-कसारा आणि कर्जत-बदलापूर मार्गावर विशेष लोकल चालवल्या. या घटनेचा फटका घरी परतणाऱ्या चाकरमानी आणि महिनाअखेरमुळे शाळा लवकर सुटलेल्या विद्यार्थ्यांना बसला. २कर्जत मार्गावरील वाहतूक दुपारी ३.३० वाजता सुरू करण्यात यश आले. त्यामुळे अपडाउन मार्गांवर झालेली लोकलची कोंडी हळूहळू सुटली. दीड तासानंतर म्हणजेच ३.५५ वाजता इंजीन रुळांवर आले. ही गाडी दुपारी ४.१८ वाजता कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक-५वर आणण्यात आली. ३त्यानंतर, लगेच कसारा ते मुंबईला येणारी लोकलसेवा पूर्ववत झाली. मात्र, या घटनेमुळे सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक तासभर विलंबाने होत होती. त्याचा फटका प्रवाशांना बसला.४घटनास्थळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल व विविध विभागांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अपघाताच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने ताशी ३० किलोमीटर वेगाने गाड्या धावल्या.तीन एक्स्प्रेसच्या वेळेत बदलमंगला एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्यामुळे, उपनगरीय लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला. दुपारी १४.१८ मिनिटांनी इंजिनाचे चाक घसरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी ३.५५ मिनिटांनी लोकल सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेमुळे ट्रेन क्रमांक १५०६६ पनवेल गोरखपूर, ट्रेन क्रमांक ११०९३ सीएसटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२८७९ एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आला. या तिन्ही एक्स्प्रेस काही तासांच्या विलंबाने रवाना करण्यात आल्या.दिवा-डोंबिवलीकरांचे हाल -या अपघातामुळे दिवा ते डोंबिवली प्रवासासाठी बहुतांशी डाऊन मार्गावरील लोकलला तासाभराचा अवधी लागला. परिणामी, प्रवासी ताटकळले. दिवा-कोपर ४० मिनिटे, तर कोपर-डोंबिवली मार्गावर २० मिनिटांहून अधिक वेळ लागल्याने प्रवासी हैराण झाले होते. असंख्य प्रवाशांनी लोकलमधून उतरत रेल्वे रुळांतून मार्ग काढण्याचा पर्याय निवडला.दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सीएसटी-अंबरनाथ लोकल डोंबिवली स्थानकात आल्यानंतर ती रद्द करून सीएसटीकरिता माघारी पाठवण्यात आली.कल्याण-डोंबिवली परिवहन विभागाने आपत्कालीन स्थिती लक्षात घेत मोहने-कल्याण मार्गावर ४ बस सोडल्या. त्यामुळे ट्रॅकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.