मुंबई : उपनगरीय लोकल सेवांना मंगळवारी पावसाचा फटका बसला. लोकलचा वेग मंदावल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.मुंबई व ठाण्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना त्याचा मोठा सामना करावा लागला. पावसामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने लोकलचा वेग मंदावला. पहाटेपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील वेळेत धावत असलेल्या लोकल या हळूहळू साधारण दहा मिनिटे उशिराने धावू लागल्या. काही स्थानकांवरील इंडीकेटर्स बंद झाल्याने आणि काही इंडिकेटर्स हे लोकलच्या वेळेची विचित्र माहिती देत असल्याने लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत होती. यात महिलांची धावपळ उडत होती. दिवसभराच्या पावसानंतर संध्याकाळीही कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरे जावे लागले. दरम्यान, मध्य रेल्वेवरील नेरूळ ते जुईनगर दरम्यान सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे लोकल उशिराने धावत होत्या. पंधरा मिनिटांत हा बिघाड दुरुस्त करण्यात आल्यानंतर हार्बरच्या लोकल वेळेवर धावण्यास सुरुवात झाली. (प्रतिनिधी)
लोकलचा वेग मंदावला
By admin | Published: September 21, 2016 5:49 AM