लोकमत न्यूज नेटवर्कठाणे / डोंबिवली : ठाणे रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक-१ जवळील कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एका रिकाम्या लोकलच्या पेंटोग्राफ व डब्याला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एका लोकलच्या पेंटोग्राफला आग लागली. ती वाऱ्यामुळे भडकल्याने लोकलचा डबाही त्यात खाक झाला. रेल्वेच्या आपत्कालीन आणि अन्य सुरक्षा यंत्रणेने घटनास्थळी तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाल्याने ती ठाणे स्थानकादरम्यान झाली की कळव्यात, या चर्चेमुळे सुरक्षा यंत्रणेचा काही वेळासाठी गोंधळ झाला होता. मात्र, अखेरीस ठाणे स्थानकातील कोपरी पुलाच्या दिशेकडील कारशेडमध्ये घटना घडल्याची माहिती सांगण्यात आली. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अंमलदार या घटनेसंदर्भात अनभिज्ञ होते. ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक एस. महिदर यांनीही घटनास्थळी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
कारशेडमधील लोकलला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2017 3:42 AM