लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. तूर्तास लॉकडाउनची गरज नाही. पण, रुग्णसंख्या पाहून निर्बंध कठोर करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन कोरोना विषाणू सद्य:स्थिती व उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर, दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.
बैठकीत झालेले निर्णयतीन दिवसांत बाधितांची संख्या दुप्पट होत आहे.९०% लोकांना लक्षणे नाहीत.उर्वरित १० टक्क्यांमध्येही १-२ टक्केच लोक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. अँटिजन टेस्टवर भर देणार.संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता चौकाचौकांत अँटिजन चाचणीचे बूथ उभारणारअँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही.गृह विलगीकरणाचा कालावधी १० दिवसांवरून सात दिवसांचा.सात दिवसांनंतर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक.