शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Corona Lockdown: राज्यात पुन्हा लॉकडाऊन परतू लागला; 'हा' महत्वाचा जिल्हा आजपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 9:08 AM

Lockdown in Satara: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. तसेच शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी पुढेही सुरू राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर १० टक्क्यांच्यावर गेला असल्याने सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्या स्तरामधील निर्बंध लागू केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी काढले आहेत. (Lockdown restrictions in Satara from today. Only essential services will open.)

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. तसेच शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी पुढेही सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकाने, कोल्ड स्टोरेज, गोदामे, रुग्णालय, निदान केंद्रे, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधे दुकाने, औषधी कंपन्या, वैद्यकीय उपकरणे विक्रीची दुकाने, सेबीच्या नियंत्रणातील सर्व कार्यालये, भारतीय रिझर्व बँकेने नियुक्त केलेल्या सर्व सेवा, विद्युत आणि गॅस पुरवठा, पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधी उत्पादने, सर्व प्रकारच्या वित्तसंस्था, वृत्तपत्रे यांना परवानगी राहणार आहे. 

राज्य शासनाच्या २५ जून रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार आरटीपीसीआर चाचण्यांद्वारे जी रुग्णवाढ नोंदवली जाते, त्यानुसार संबंधित जिल्ह्याचा स्तर ठरविण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना करण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यानुसार सातारा जिल्ह्याचा रुग्ण वाढीचा दर १२ टक्‍क्‍यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी हे निर्बंध लागू केले आहेत.

साताऱ्यात काय सुरु काय बंद...- सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार- अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व दुकाने बंद राहणार- अत्यावश्यक बाबींची दुकाने आता सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार- हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, पार्सल सेवा सकाळी ९ ते रात्री ८ वेळेत सुरू राहील- कोणत्याही क्रीडा स्पर्धा घेता येणार नाहीत- सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रार्थना स्थळ राहणारया बाबी निर्बंध पाळून सुरू राहतील- सार्वजनिक जागा, खुली मैदाने या ठिकाणांवर सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत व्यायाम व चालण्यास परवानगी आहे.- लग्न आणि अंत्यविधी यांच्यासाठी निर्बंध ठेवून परवानगी- बांधकामांना परवानगी मात्र कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक- कृषी दुकाने आठवडाभर दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील- केश कर्तनालय सुरू राहतील- सार्वजनिक परिवहन बस सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहील- मालवाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी- खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी- आयसोलेशन बबलमध्ये चित्रीकरणास परवानगी- बाजार समित्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील

.... यांना ई पास बंधनकारकपाचव्या स्तरातील जिल्ह्यातून जे प्रवासी सातारा जिल्ह्यात येणार आहेत त्यांना ई पास बंधनकारक आहे. पास नसेल तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्या व्यतिरिक्त पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरातील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना ई पासचे बंधन राहणार नाही.

मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी..सर्व शाळा महाविद्यालय यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज पडते आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील रिक्त असणारी शैक्षणिक साहित्याची दुकाने जरी बंद ठेवण्यात येणार असली तरी संबंधितांना घरपोच साहित्य देता येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक