शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

श्रमलेल्या बापाची बुलंद कहाणी... आजूबाजूच्या जागांवर सोडलं पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 6:07 AM

भाजपची व्यूहरचना यशस्वी; पवारांना अडकवले बालेकिल्ल्यातच

- सचिन जवळकोटेराष्ट्रवादीची खरी ताकद म्हणजे केवळ शरद पवार. त्यामुळं या ‘पॉवर’बाज नेत्याला बारामतीतच अडकवून ठेवून बाकीच्या मतदारसंघांवर आक्रमण करण्याचा ‘भाजप’ नेत्यांचा मनसुबा प्रत्यक्षात उतरला गेला. पवारांच्या आघाडीतील सोलापूर, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली अन् उस्मानाबादच्या उमेदवारांना याचा नेमका फटका बसला. गेलेल्या जागा मिळवणं तर सोडाच, हातातल्याही गमवाव्या लागल्या.

बारामतीच्या विजयानंतर सुप्रियातार्इंनी ‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी’ कविता सोशल मीडियावर सादर केली असली तरी ‘आजूबाजूच्या मतदारसंघावर सोडावं लागलं पाणी..’ हे पुढचं वाक्य मात्र कार्यकर्त्यांसाठी गुपितच ठरलेलं.प्रत्येक तालुक्यातील मातब्बर नेत्याला आपल्यासोबत ठेवून त्या-त्या जिल्ह्याचं राजकारण यशस्वीपणे हाकणाऱ्या शरद पवारांची काही गणितं यंदाच्या लोकसभेला भलतीच चुकली. त्यामुळं निकालाची समीकरणं पार बदलून गेली. पवार भलेही अवघ्या महाराष्ट्राच्या जीवावर देशाचं नेतृत्व करू पाहत असले तरी त्यांची खरी ताकद केवळ पश्चिम महाराष्ट्रातच.

गेल्यावेळी २०१४ साली त्यांचे चार खासदार निवडून आलेले. त्यापैकी माढ्यात मोहिते-पाटील, साताºयात उदयनराजे अन् कोल्हापुरात महाडिक स्वत:च्या ताकदीवरच निवडून आलेले. बारामतीच्या सुप्रियातार्इंचा कसाबसा निसटता विजय. कोल्हापूर अन् माढाही हातातून गमवावं लागलं.महाराष्टÑात काँग्रेसपेक्षाही राष्टÑवादीच आपल्याला अधिक त्रासदायक ठरतेय, हे अचूक ओळखलेल्या भाजप नेत्यांनी यंदा पवारांच्या बालेकिल्ल्यावरच तुफानी मारा केला. चंद्रकांतदादा पाटील कोल्हापुरात नसतील एवढे ते माढा अन् बारामतीत फिरले. मुख्यमंत्री फडणवीसही मुंबईत बसूनच इथल्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात राहून व्यूहरचना आखत गेले. पवारांना बारामतीतच पॅक केलं तर बाकी ठिकाणी त्यांना प्रचारासाठी बाहेर पडता येणार नाही, याचा पुरेपूर बंदोबस्त केला गेला.दौंडचे कूल, अकलूजचे मोहिते-पाटील अन् इंदापूरचे हर्षवर्धन बंधू यांच्या गुफ्तगूचे फोटो पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘बारामती’ अधिकच सावध बनली. सतर्क झाली. गेल्यावेळी झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर अधिक भर दिला गेला... अन् याच व्यूहरचनेत माढ्याचे उमेदवार संजयमामा शिंदे अडकले. राष्ट्रवादीचा बुलंद बालेकिल्ला पाहता पाहता ढासळला. रामराजे, बबनदादा शिंदे, प्रभाकर देशमुख अन् गणपतराव देशमुख यांच्या तालुक्यातील साम्राज्याचे बुरुज खिळखिळे झाले. कारण या टापूत भाजपला प्रथमच एवढी भरभरून मतं मिळाली.
च्स्वत: शरद पवार बारामतीच्या प्रचार यंत्रणेवर काळजीपूर्वक लक्ष देऊ लागले. याचा व्हायचा तो परिणाम बरोबर झाला. ज्या पद्धतीनं पवारांनी महाराष्ट्रभर नेहमीप्रमाणं झंझावाती दौरे आखायला हवे होते, ते अपेक्षेप्रमाणे घडलेच नाही.च्अशातच दर चार-पाच दिवसाला भाजप-सेनेची टीम आलटून-पालटून ‘तार्इंचा पराभव’ या मुद्यावर जोरजोरात चॅलेंज देऊ लागली. बारामतीवर राजकीय बॉम्ब टाकला तर त्याचा धुरळा आजूबाजूच्या मतदारसंघात उडू शकतो,हे या मंडळींनी अचूक ओळखलेलं..

टॅग्स :baramati-pcबारामती