अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 04:01 PM2019-04-04T16:01:56+5:302019-04-04T16:07:45+5:30

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता.

Lok sabha elecstion 2019 first Lok Sabha election in India | अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक

अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक

googlenewsNext

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. सोशल मिडिया बरोबर वेगवेगळ्या मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून केला जात आहे. प्रत्येक वेळी होणाऱ्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी आठवणीत राहत असतात. त्याचप्रमाणे, भारतात झालेली पहिली लोकसभा निवडणूक रंजकच ठरली होती. २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेबुवारी १९५२ मध्ये पार पडलेली ही निवडणूक पाच महिने चालली होती.

भारतात १९५० मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.  त्यावेळी सुकुमार जैन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त ठरले. त्यानंतर प्रथमच मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये १७ कोटी ६० लाख मतदारांची नोंदणी झाली होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २१ वर्षे वयाची अट होती. पाच महिने चाललेल्या या निवडणुकीत १ हजार ८७४ उमेदवार रिंगणात होते.

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळच्या मतपेट्या बुलेटप्रुफ होत्या.  

मतदारांना उमेदवाराची ओळख व्हावी म्हणून नावासमोर चिन्ह दिली गेली होती. चिन्ह देण्याची त्यावेळची पद्धत आज कायम आहे. त्या निवडणुकीत सुमारे २८ लाख महिला मतदारांचा समावेश होता. त्यावेळचा देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे निवडणुकीतील चिन्ह बैलं होते. जगात सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असललेल्या भारतातील आजपर्यंतच्या निवडणुकांपैकी देशाची पहिली निवडणुक ऐतिहासिक मानली जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम तब्बल पाच महिने चालला होता.

Web Title: Lok sabha elecstion 2019 first Lok Sabha election in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.